घरक्रीडाFootball : रोनाल्डो ८०० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू; सर्वाधिक गोल रियल मॅड्रीडसाठी

Football : रोनाल्डो ८०० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू; सर्वाधिक गोल रियल मॅड्रीडसाठी

Subscribe

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये विक्रमांचा बादशहा असलेला पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोंने आणखी एक विक्रम त्याच्या नावावर केला आहे

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये विक्रमांचा बादशहा असलेला पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोंने आणखी एक विक्रम त्याच्या नावावर केला आहे. गुरुवारी त्याने मँचेस्टर युनायटेड कडून खेळताना आर्सेनलविरुद्ध २ गोल केले. त्यासोबतच तो ८०० गोल करणारा पहिला फुटबॉलर ठरला आहे. मात्र ब्राझीलचा दिग्गज खेळाडू पेले आणि रोमॅरियो या दोघांनी १००० हून अधिक गोल केल्याचा दावा केला जातो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. काही आंतरराष्ट्रीय संस्थाच्या माहितीनुसार पेलेचे ७६९ आणि फेरेंक पुस्कासचे ७६१ गोल ​​आहेत.

रोनाल्डोने पेनल्टी किकवर गोल केला हाफ टाईमनंतर १० व्या मिनिटाला रोनाल्डोने पहिला गोल केला. यासह त्याने त्याचे ८०० गोल पूर्ण केले. त्याने सामन्याच्या ७० व्या मिनिटाला पेनल्टी किकला गोलमध्ये रूपांतरित करून आपला दुसरा गोल केला. त्याचे आता एकूण ८०१ गोल झाले आहेत.

- Advertisement -

रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडसाठी ८०१ गोलमधील दोन स्पेलमध्ये १३० गोल केले आहेत. तर स्पोर्टिंगने लिस्बनसाठी ५ गोल, रिअल माद्रिदसाठी ४५० गोल आणि जुव्हेंटससाठी १०१ गोल केले आहेत. त्याच वेळी त्याने पोर्तुगालसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ११५ गोल केले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक गोल करणारे खेळाडू

आंतरराष्ट्रीय स्तरावरही रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच इराणच्या अली देईचा १०९ गोलचा विक्रम मोडला होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ११५ गोल केले आहेत. तर सध्या खेळल असलेल्या कोणत्याही फुटबॉलपटूने १०० गोलचा देखील टप्पा गाठलेला नाही. भारताचा खेळाडू सुनील छेत्री आणि लिओनेल मेस्सी हे रोनाल्डोपेक्षा ८० गोलांनी मागे आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: http://IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या सामन्यात कोहली स्वस्तात परतला; कित्येक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी हुकली


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -