घरक्रीडाऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक व फलंदाज पीटर नेव्हिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पीटर नेव्हिल हा खांद्याच्या दुखापतीमुळं फेब्रुवारीपासून मैदानापासून दूर होता.

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक व फलंदाज पीटर नेव्हिलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पीटर नेव्हिल हा खांद्याच्या दुखापतीमुळं फेब्रुवारीपासून मैदानापासून दूर होता. पीटर नेव्हिल यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया संघासाठी १७ कसोटी सामने आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे ४६८ आणि २५ धावा आहेत.

मला माहितीय माझ्या कारकिर्दीचा शेवट जवळ आलाय. माझ्यासाठी हा एक निराशाजनक हंगाम होता. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी दुखापतीमुळं अनेक सामने गमावलेत. पण, मला खूप अभिमान आहे. कारण, मी ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकलो. गेली इतके दिवस न्यू साउथ वेल्स संघाचाही मी भाग होतो. पण, मला वाटतं आता पुढं जाण्याची वेळ आलीय. त्यामुळंच मी निवृत्तीची घोषणा केलीय, असं त्यानं स्पष्ट केलं.

- Advertisement -

पीटर नेव्हिल यानं २०१५ मध्ये अॅशेस खेळताना ४५ धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा असताना नेव्हिल प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र त्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी त्याच्याजागीत्याला मॅथ्यू वेड याला संघात स्थान देण्यात आलं होतं. मॅथ्यू वेड यानं कसोटी आणि टी-20 सामने खेळले पण त्याला एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नाही.


हेही वाचा – IPL 2022: गौतम गंभीरचा ‘तो’ मास्टरस्ट्रोक पडला धोनीवर भारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -