Air Force Planes Collide : दक्षिण कोरियात वायुसेनेच्या दोन विमानांची भीषण टक्कर, ३ वैमानिकांचा मृत्यू

Air Force Planes Collide 3 pilots killed in Two Air Force planes collide in South Korea
Air Force Planes Collide : दक्षिण कोरियात वायुसेनेच्या दोन विमानांची भीषण टक्कर, ३ वैमानिकांचा मृत्यू

दक्षिण कोरियाच्या दोन प्रशिक्षणार्थी विमानांचा हवेत भीषण अपघात झाला आहे. विमानांची टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन वैमानिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. भीषण अपघात सैचओन एयरबेसच्या जवळ झाला आहे.

दक्षिण कोरियाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व शहर सैचओनच्या एयबेसजवळ दुपारी १.३५ वाजताच्या सुमारास केटी-१ विमान हवेत एकमेकांना धडकले. मीडिया अहवालानुसार एक वैमानिक जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु वायुसेनेकडून अपघाताबाबत कोणतीही अधिकृत सूचना दिली नाही.

वायुनेसेकडून सांगण्यात आले आहे की, विमान दुर्घटनेमध्ये किती लोकांचा समावेश आहे. याबाबत माहिती घेण्यात येत आहे. योनहॅप न्यूज एजन्सीने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांमार्फत सांगितले आहे की, तीन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी ३० पेक्षा जास्त अग्निशमनची वाहने दाखल झाली आहेत.

विमान दुर्घटनेतील वैमानिकांनी सुरक्षित बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता की नाही याचा तपास केला जात आहे. केटी-१ एयरक्राफ्ट दोन सीट असलेले विमान असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा : ठाकरे सरकारचा मोठा दिलासा! राज्यात ‘CNG’ ६ रुपयांनी तर ‘PNG’ ३.५० रुपयांनी स्वस्त