घरक्रीडाIPL 2022 : धोनीचं नाव नसलं तरी...,खेळाडूंना रिटेन करण्याबाबत गौतम गंभीरचा धोनीवर...

IPL 2022 : धोनीचं नाव नसलं तरी…,खेळाडूंना रिटेन करण्याबाबत गौतम गंभीरचा धोनीवर निशाणा

Subscribe

आयपीएल २०२२ च्या हंगामाआधी प्रत्येक टीमला त्यांचे रिटेन केलेले खेळाडू घोषित करण्यात येणार आहेत. तसेच आज(मंगळवार) दुपारी १२ वाजेपर्यंत प्रत्येक संघाला ही यादी बीबीसीआयकडे द्यायची होती. परंतु बीसीसीआय प्रत्येक संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. तर ४ खेळांडूंना रिटेन केलं तर संघाला ४२ कोटी रूपये खर्च होतील आणि ३ खेळाडू रिटेन केले तर संघाला ३३ कोटी रूपये खर्च होणार आहेत.

संघातून कोणत्या खेळाडूला रिटेन करण्यात आलायं, यावर क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्षं आहे. परंतु दुसरीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णदार महेंद्र सिंग धोनीवर निशाणा साधला आहे. स्टार स्पोर्टशी संवाद साधताना त्याने म्हटलं की, चेन्नईच्या चार खेळाडूंची निवड गौतम गंभीरने केली होती. परंतु त्याने माहीच्या नावाचा समावेश देखील केला नाही. त्यामुळे चेन्नईने ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा , फाफ डुप्लेसिस आणि सॅम करन या चार खेळाडूंना रिटेन केलं पाहिजे. असे मत गंभीरने मांडले.

- Advertisement -

रिटेन खेळाडूंमध्ये धोनीचं नाव नसलं तरी चेन्नई सुपर किंग्स धोनीला टीममध्ये ठेवणार हे निश्चित असल्याचं गंभीरने म्हटलं आहे. चेन्नईकडून धोनी सर्वाधिक रक्कम घेणारा खेळाडू असून त्याला १६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. धोनीच्या व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जाडेजा यांचंही रिटेन होणं निश्चित असल्याचं गंभीरनं सांगितलं आहे.


हेही वाचा: IPL 2022 : RCB ने विराट कोहली व्यतिरिक्त या खेळाडूला केले रिटे

- Advertisement -

महेंद्र सिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. त्यामुळे कमीत कमी अजून एका हंगामासाठी तो टीममध्ये खेळण्यासाठी तयार आहे. परंतु धोनीने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, तो आपला शेवटचा टी-२० सामना चेन्नईमध्ये खेळणार आहे.

दरम्यान, आरसीबीच्या संघाने विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल व्यतिरिक्त गोलंदाज मोहम्मद सिराजला रिटेन केलं आहे. आरसीबीकडून खेळताना सिराजने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलच्या १४ व्या हंगामात त्याने १५ सामन्यांत ११ बळी घेतले आहेत. त्याच्याकडे आक्रमक गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -