घरताज्या घडामोडीनाशिककरांना हुडहुडी! आठवडाभरात पारा ८ अंशांनी घसरला

नाशिककरांना हुडहुडी! आठवडाभरात पारा ८ अंशांनी घसरला

Subscribe

शहरातील तापमानात ८ अंशांनी घसरण, पारा १९ अंशांवरून थेट १२ अंशावर

पंचवटी – उत्तरेकडून वाहणार्‍या थंड वार्‍यामुळे वातावरणात गारठा वाढला असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. शहरात सायंकाळी थंड वारे वाहत असल्याने नाशिककरांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या आवडाभरात शहरातील तपमानात ८ अंशांनी घसरण झाली असून, १९ अंशांवरून पारा १२ अंशावर आला आहे.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून वातावरण ढगाळ होत जाऊन थंडी गायब होण्यासह कमाल आणि किमान  तपमानातही वाढ झाली होती. त्यामुळे ऐन थंडीत नाशिककरांना ऑक्टोबर हिटची अनुभूती येऊन नोव्हेंबर तापदायक ठरत होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून नाशिकचं कमाल तपमान २२, तर किमान तपमान १९ अंशांवर पोहोचलंय. चार ते पाच दिवसांपासून तापमानात कमालीची घसरण होत असल्याने गारठा वाढला आहे.

- Advertisement -

२४ नोव्हेंबर रोजी २१.५ अंश सेल्सिअसवर असलेला पारा २५ रोजी दोन अंशांनी घसरला, तर सोमवारी हा पारा थेट ८ अंशांनी घसरत १२.४ अंशापर्यंत पोहोचला. त्यामुळे शहरात अचानक गारठा वाढला आहे. हवामान विभागानुसार वातावरण कोरडे आहे. तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी उत्तर पूर्व दिशेने थंड वारे वाहत होते त्यामुळे तापमानात घट दिसून आली. पुढील आठवडयात मध्य भारतात ढगांची गर्दी दिसून येईल, त्यामुळे रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होईल असा अंदाज आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -