घरक्रीडाIPL 2022 : हार्दिकचा 'गुजरात' संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ

IPL 2022 : हार्दिकचा ‘गुजरात’ संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ

Subscribe

मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विजयासह गुजरातच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गुजरात आणि लखनऊ संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) यंदाचे 15 वे पर्व असून, या पर्वात २ नवे संघ सामिल झाले आहेत. या दोन्ही संघाने यंदाच्या हंगमावर वर्चस्व गाजवल आहे. या दोन संघांपैकी कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स संघ प्लेऑफमध्ये प्रथम स्थानी आला आहे. गुजरात टायटन्स आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरलाय.

मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विजयासह गुजरातच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गुजरात आणि लखनऊ संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने उत्तम कामगिरी केली आहे. गुजरातने 12 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत.

- Advertisement -

गुजरातचा संघ 18 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातचे फक्त तीन पराभव झाले आहेत. आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे. गुणतालिकेत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. तर 12 सामन्यात 8 विजयासह लखनऊचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत लखनऊचा संघ आघाडीवर आहे. त्याशिवाय राजस्थान आणि आरसीबीचा संघ प्रत्येक 14-14 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. लखनौ, राजस्थान आणि आरसीबी सध्या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याशिवाय दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि पंजाब यांचे प्रत्येकी 10-10 गुण आहेत.

दरवर्षी आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारे मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांना यंदाच्या हंगमात चांगली कामगिरी करता आलेली नाही. कालच्या लखनराशिद खान याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव केला. 144 धावांचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. लखनौचा संपूर्ण संघ 82 धावांत संपुष्टात आला. गुजरातने दिलेल्या माफक 144 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले.

- Advertisement -

डिकॉकने 11 तर राहुलने 8 धावा केल्या. दीपक हुडाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही फंलदाजाने त्याला साथ दिली नाही. दीपक हुडाने 27 धावांची छोटेखानी खेळी केली. करण शर्मा 4, क्रृणाल पांड्या 5, आयुष बडोनी 8, मार्कस स्टॉयनिस 2, जेसन होल्डर 1, मोहसीन खान 1 आणि आवेश खान 12 धावा काढून बाद झाले.

गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान याने भेदक मारा केला. राशिदने 3.5 षटकात 24 धावा देत चार गड्यांना बाद केले. आर साई किशोर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली तर मोहम्मद शामीने एक विकेट घेतली. शामीने तीन षटकात फक्त पाच धावा दिल्या.


हेही वाचा – IPL 2022 : पंतनेही रसेलप्रमाणेच फलंदाजी करावी, रवी शास्त्रींचा सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -