Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ICC Rankings : न्यूझीलंड नंबर वन! वनडेत भारताची तिसऱ्या स्थानी घसरण

ICC Rankings : न्यूझीलंड नंबर वन! वनडेत भारताची तिसऱ्या स्थानी घसरण

दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीकडून नव्याने क्रमवारी जाहीर करण्यात येते.

Related Story

- Advertisement -

विश्वविजेत्या इंग्लंडला मागे टाकत न्यूझीलंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एकदिवसीय क्रमवारीतील संघांच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या क्रमवारीनुसार, इंग्लंडची एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या स्थानी घसरण झाली असून टी-२० क्रमवारीत त्यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने मागील तीन वर्षांत ३० पैकी २० एकदिवसीय सामने जिंकले आहे. त्यामुळे त्यांना दोन स्थानांची बढती मिळाली असून त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली. भारतीय संघाची एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

न्यूझीलंडची दमदार कामगिरी

दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीकडून नव्याने क्रमवारी जाहीर करण्यात येते. या क्रमवारीत केवळ मागील तीन वर्षांचे निकाल ग्राह्य धरले जातात. या तीन वर्षांच्या कालावधीत न्यूझीलंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. न्यूझीलंडचा संघ २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपचा उपविजेता ठरला होता. त्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांना एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्यात यश आले.

भारत टी-२० मध्ये दुसऱ्या स्थानी

- Advertisement -

विराट कोहलीच्या भारतीय संघाची एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र, टी-२० क्रमवारीत त्यांनी दुसरे स्थान पटकावले. या यादीत इंग्लंड (२७७ गुण) अव्वल स्थानावर असून त्यांच्यात आणि भारतामध्ये केवळ पाच गुणांचा फरक आहे. तसेच न्यूझीलंडने टी-२० क्रमवारीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

- Advertisement -