घरक्रीडासंघासाठी योग्य तोच निर्णय घेणार!

संघासाठी योग्य तोच निर्णय घेणार!

Subscribe

भारतीय संघाने अँटिग्वा येथे झालेला पहिला सामना जिंकत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. भारताने हा सामना जिंकला असला तरी या सामन्यातील संघ निवडीवर बरीच टीका झाली. या सामन्यात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांनी आश्चर्य व्यक्त केले. कर्णधार विराट कोहलीला याबाबत सामन्यानंतर विचारले असता तो म्हणाला की, संघासाठी योग्य असेल तोच निर्णय आम्ही घेतो.

आम्ही सर्व मिळून संघ निवडीबाबतचा निर्णय घेतो. कोणत्या खेळाडूची अंतिम संघात निवड झाली पाहिजे आणि कोणाची नाही, याबाबत लोकांची विविध मते असतात. मात्र, संघासाठी योग्य असेल तोच निर्णय आम्ही घेतो. या सामन्यात हनुमा विहारीला खेळण्याची संधी मिळाली, कारण तो कामचलाऊ गोलंदाजी करू शकतो. जर आमची षटकांची गती कमी असेल, तर त्याला गोलंदाजी देता येते, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

अजिंक्य रहाणेला मागील दोन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये शतक करण्यात अपयश आले होते. मात्र, त्याने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ८१ आणि १०२ धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर कोहलीने त्याचे कौतुक केले. रहाणेने दोन्ही डावांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली. राहुलनेही चांगली फलंदाजी केली. विहारीचे योगदानही विसरून चालणार नाही, असे कोहलीने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -