घरक्रीडाICC Women World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकसाठी भारतीय संघ जाहीर, मिताली...

ICC Women World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकसाठी भारतीय संघ जाहीर, मिताली राजकडे संघाची कमान

Subscribe

विश्वचषकाचा पहिला सामना 4 मार्च 2022 रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळवला जाईल आणि 3 एप्रिल 2022 रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी महिला विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडमध्ये 4 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. एकदिवसीय विश्वसचषक स्पर्धेसाठी 15 सद्स्यांची टीम जाहीर करण्यात आली आहे. यामधून भारताची स्टार क्रिकेटपटू जेमिमा रोड्रिग्सला संघातून वगळण्यात आले आहे. तसेच अनुभवी खेळाडू मिताली राजकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरला देण्यात आली आहे. रोड्रिग्स आणि अष्टपैलू खेळाडू शिखा पांजे कमी फॉर्ममध्ये असल्यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले आहे. जेमिमा गेल्या वर्षीच्याच्या आंतरराष्ट्रीय असाइनमेंटमध्ये दुहेरी अंक मिळवण्यात अपयशी ठरली आहे.

भारतीय महिला खेळाडूंचा 14 जणांचा संघ 9 ते 24 फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत देखील भाग घेईल, ज्यामध्ये एक T20 आंतरराष्ट्रीय आणि पाच एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

15 सदस्यीय भारतीय महिला संघ

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शैफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.

स्टँडबाय खेळाडू : साभीनेनी मेघना, एकता बिश्त, सिरमन दिल बहादूर

- Advertisement -

एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत

या स्पर्धेत एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषकाचा पहिला सामना 4 मार्च 2022 रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळवला जाईल आणि 3 एप्रिल 2022 रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल. भारत ६ मार्चला क्वालिफायर संघाशी सामना करून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

उपांत्य फेरीचे सामने क्राइस्टचर्च आणि वेलिंग्टन येथे होणार आहेत तर अंतिम सामना क्राइस्टचर्च येथे होणार आहे. या विश्वचषकात भारत एकूण सात सामने खेळणार आहे. यामध्ये चार सामने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड आणि उर्वरित तीन सामने पात्र संघांविरुद्ध आहेत ज्यांचा निर्णय होणे बाकी आहे. मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय संघ महिला विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.


हेही वाचा : Richest Athletes: जगातील 30 सर्वात श्रीमंत खेळाडू; यादीत Virat Kohli आणि MS Dhoni चं नावच नाही

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -