घरक्रीडाश्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का; 'हा' खेळाडू संघाबाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

Subscribe

यंदाचा विश्वचषक भारतात खेळवला जाणार असून, त्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे परदेशात आणि मायदेशी अनेक सामने होणार आहेत. त्यानुसार उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरू होणार आहे.

यंदाचा विश्वचषक भारतात खेळवला जाणार असून, त्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे परदेशात आणि मायदेशी अनेक सामने होणार आहेत. त्यानुसार उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरू होणार आहे. हा सामना विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. मात्र या वनडे मालिकेपूर्वीच भारतीय संघाल मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाबाहेर गेला आहे. (Ind V Sl Odi Series Due To More Rest Jasprit Bumrah Again Out Of Odi Team Of India)

यंदाच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ तयारीला लागला आहे. अशातच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात परतणार होता. पण ऐन सामन्याच्या एक दिवस आधी जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धची मालिका खेळणार नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहला संघ जाहीर झाला तेव्हा संघात सामील करण्यात आले नव्हते, परंतु या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचा ३ जानेवारी रोजी एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र आता या निर्णयानंतर अवघ्या ६ दिवसांनी त्याला पुन्हा संघातून वगळण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह टी-२० विश्वचषकही खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम केले आणि त्याला तंदुरुस्त घोषित देखील करण्यात आले. एनसीएने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यानंतरच भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय संघात समावेश केला होता.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत खेळताना दिसू शकतो. ही मालिका १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराहचा फिटनेस भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याव्यतिरिक्त भारतीय संघाला विश्वचषकही खेळायचा आहे.

भारताचा वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.


हेही वाचा – यंदाची ‘हिंद केसरी’ महाराष्ट्राकडे; हरियाणाच्या सोमवीरचा पराभव करत पुण्याचा अभिजीत कटके विजयी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -