घरक्रीडा...तरच हार्दिक पांड्याला कसोटीत स्थान मिळेल; विराट कोहलीची कठोर भूमिका

…तरच हार्दिक पांड्याला कसोटीत स्थान मिळेल; विराट कोहलीची कठोर भूमिका

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमध्ये भारतासाठी हार्दिक पांड्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या शानदार कामगिरीनंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठीही संघात स्थान देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पांड्याला कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हार्दिकला फक्त फलंदाज म्हणून कसोटी संघात खेळवणार का? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला. यावर बोलताना टेस्ट टीममध्ये खेळण्यासाठी हार्दिकने नियमित गोलंदाजी करणे आवश्यक आहे, केवळ फलंदाज म्हणून आम्ही कसोटी संघात घेवू शकत नाही. पण हार्दिक पांड्या अष्टपैलू म्हणूनच कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान मिळवू शकतो, असे विराट कोहलीने सांगितले.

- Advertisement -

हार्दिक सध्या गोलंदाजी करु शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. कसोटी क्रिकेट हे वेगळे आव्हान आहे. त्यासाठी आम्हाला त्याच्या गोलंदाजीची गरज आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील पिचवर कसोटी खेळताना टीममध्ये संतुलन निर्माण करणारा खेळाडूची आम्हाला हवा आहे. हार्दिक पांड्या ज्या जागेवर क्रिकेट खेळतो त्या जागेवर खेळणाऱ्या खेळाडूने क्रिकेटमध्ये ऑल राऊंड कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. हार्दिकला देखील याची जाणीव असून त्यालाही लवकरात लवकर गोलंदाजी सुरु करायची आहे’, असे विराट म्हणाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -