घरक्रीडाIND vs ENG 1st T20 : इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, रोहित...

IND vs ENG 1st T20 : इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, रोहित शर्माला विश्रांती 

Subscribe

भारताने उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना शुक्रवारी (आज) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दव पडण्याची शक्यता असल्याने इंग्लंडने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी अनुभवी सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि शिखर धवन भारताच्या डावाची सुरुवात करतील, असे नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

- Advertisement -

सूर्यकुमारला संधी नाही

तसेच भारताने सूर्यकुमार यादवला अंतिम ११ मध्ये स्थान देणे टाळले आहे. या सामन्यासाठी भारताने धवन, राहुल, कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या या फलंदाजांची संघात निवड केली आहे. तसेच डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल, ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर, लेगस्पिनर युजवेंद्र चहल, तसेच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर हे भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -