घरक्रीडाIND vs ENG 2nd Test : इंग्लंडची नाणेफेक जिंकून गोलंदाजी; अश्विनला संधी...

IND vs ENG 2nd Test : इंग्लंडची नाणेफेक जिंकून गोलंदाजी; अश्विनला संधी नाहीच

Subscribe

सलग दुसऱ्या कसोटीसाठी अश्विनला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून खेळला जात आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे आजपासून होणारा दुसरा कसोटी सामना जिंकून पाच सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेण्याची दोन्ही संघांना संधी आहे. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पायाच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला संधी मिळेल असे म्हटले जात होते. परंतु, सलग दुसऱ्या कसोटीसाठी अश्विनला संघाबाहेर ठेवण्यात आले असून अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला संधी देण्यात आली आहे.

मोईन अलीचे पुनरागमन  

ढगाळ वातावरणामुळे इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यांनी या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीमुळे उर्वरित मालिकेत खेळणार नाही. तर पहिल्या कसोटीत खेळलेल्या डॅन लॉरेंस आणि झॅक क्रॉली यांना वगळण्यात आले असून मोईन अली, हसीब हमीद आणि मार्क वूड यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -