घरक्रीडाआता तुला पुन्हा विराटच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार; रहाणेने दिलं 'हे' उत्तर

आता तुला पुन्हा विराटच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार; रहाणेने दिलं ‘हे’ उत्तर

Subscribe

विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत पराभव करत अतिशय महत्त्वाच्या अशा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफिवर पुन्हा एकदा भारताचं नाव कोरलं. शांत आणि संयमी अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासह जगभरातील क्रिकेट रसिकांची, दिग्गजांची मनं जिंकली. अनेक दिग्गजांनी त्याच्या नेतृत्व कौशल्याचं कौतुक देखील केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला आहे. फेब्रुवारी पासून भारताची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु होणार आहे. दरम्यान, सुट्टीवर असलेला भारताचा प्रमुख कर्णधार विराट कोहली भारतीय संघात परतणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे कसोटी संघआचं कर्णधारपद असणार आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणे यावर काय प्रतिक्रिया देईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र, अजिंक्य रहाणेच्या प्रतिक्रियेनं पुन्हा एकदा त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

इंग्लंड-भारत कसोटी मालिकेसाठी विराट कर्णधार म्हणून पुन्हा संघात येत आहे. तर अजिंक्य उपकर्णधार असणार आहे. ऑस्ट्रेलियातील यशानंतर विराट आणि अजिंक्य यांच्यातील नात्यात काही बदल होणार का? याबद्दल अजिंक्यला पीटीआयकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजिंक्यने अतिशय स्पष्ट उत्तर दिलं. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना अजिंक्यनं निर्विवादपणे विराटच संघाचा कर्णधार असून आपण जेव्हा गरज असेल तेव्हा संघाचं नेतृत्त्वं करण्यासाठी आहोतच अशी मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली. अजिंक्य रहाणेवर पुन्हा एकदा संघाच्या उपकर्णधारपदाची जबबादारी असेल तर, इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा विराट कोहली भूषवेल. याचबाबत प्रतिक्रिया देत अजिंक्यनं त्याची बाजू स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाला रहाणे?

विराट संघात आल्यावर तो कर्णधार असेल आणि मी उपकर्णधार असेन. पण आमच्यातील नातं अजिबात बदलणार नाही. तो कायमच आमच्या संघाचा कर्णधार होता आणि यापुढेही राहिल. तो संघात नसताना कर्णधारपदाची सुत्रे मला सांभाळावी लागतात आणि ती जबाबदारी मी सर्वोत्तम प्रकारे पार पाडण्याचा नेहमी प्रयत्न करतो. संघाचा कर्णधार कोण आहे याचा फारसा फरक पडत नाही. कर्णधार असलेला खेळाडू आपली भूमिका कशी पार पाडतो हे महत्त्वाचे आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी नक्कीच संघाला विजयी करण्याचा प्रयत्न करेन, असं अजिंक्य म्हणाला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -