घरक्रीडाIND vs NZ Test series : पहिल्या सत्रातच न्यूझीलंडचे जोरदार कमबॅक; भारताचा...

IND vs NZ Test series : पहिल्या सत्रातच न्यूझीलंडचे जोरदार कमबॅक; भारताचा निम्मा संघ माघारी

Subscribe

भारतीय संघाने पहिल्या सत्रात फक्त ५१ धावा करून ५ फलंदाज गमावले आहेत

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांमधील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. तिसऱ्या दिवसाअखेर चेतेश्वर पुजारा (९) आणि मयंक अग्रवालने (४) धावा केल्या होत्या. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात २९६ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे भारताला ४९ धावांची आघाडी मिळाली. अक्षर पटेलने चमकदार कामगिरी करत ५ बळी पटकावले होते. तर अश्विनने (३) आणि रवींद्र जडेजा आणि उमेश यादवने प्रत्येकी २-२ बळी पटकावून पहिल्या डावात भारतीय संघाची मकड मजबूत केली. दरम्यान चौथ्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारतीय संघाला २ मोठे झटके बसल्यानंतर भारतीय संघाचा डाव सावरत होता. अश्विन आणि श्रेयश अय्यरमध्ये भागीदारी सुरू होती. मात्र लक्षणीय बाब म्हणजे चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच न्यूझीलंडने जोरदाक कमबॅक केला आणि भारताच्या निम्म्या संघाला बाद केले आहे.

- Advertisement -

भारतीय संघाने पहिल्या सत्रात फक्त ५१ धावा करून ५ फलंदाज गमावले. भारतीय संघाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे पहायला मिळाले. जडेजा देखील काही खास कामगिरी करू शकला नाही. चौथ्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारतीय संघाकडून निराशाजनक कामगिरी झाली. चेतेश्वर पुजारा, कर्णधार अजिंक्य रहाणे नंतर आता मयंक अग्रवालदेखील माघारी परतला आहे. भारतीय संघाला चौथ्या दिवसाच्या पहिल्या १ तासातच ३ मोठे झटके बसले होते.

- Advertisement -

भारताला तिसरा झटका १५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार रहाणेच्या रूपात बसला. १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद ४१ एवढी होती तेव्हा श्रेयश अय्यर आणि अग्रवाल फलंदाजी करत होते. तर १२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्याला काइल जेमिसनने बाद केले.

आठ षटकांपर्यंत भारताची धावसंख्या दुसऱ्या डावात १ बाद २९ एवढी होती. तेव्हा चेतेश्वर पुजारा (१०) आणि मयंक अग्रवाल (८) धावांवर खेळत होते.


हे ही वाचा: http://IND vs NZ Test series : सलामीवीर शुभमन गिलवर इरफान पठाण नाराज;म्हणाला त्याने त्याच्या…


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -