घरक्रीडाIND VS SL: भारताविरोधात टी-20 सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा, मिस्ट्री गोलंदाजाला संधी

IND VS SL: भारताविरोधात टी-20 सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा, मिस्ट्री गोलंदाजाला संधी

Subscribe

संघात चंडिमल, वनेंदू हसरंगासारखे खेळाडू आहेत. आयपीएल लिलाव 2022 मध्ये हसरंगाला 10.75 कोटी इतकी मोठी बोली मिळाली आणि अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्यात. याशिवाय मिस्ट्री स्पिनर महिष तेक्षनालाही संघात संधी मिळालीय, ज्याच्यावर चेन्नई सुपर किंग्जने सट्टा लावलाय. याशिवाय दुष्मंता चमिरा हा देखील श्रीलंकेच्या संघाचा एक भाग आहे.

नवी दिल्लीः भारताविरोधात टी -20 सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमनं घोषणा केलीय. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यांसाठी श्रीलंकेनं 18 सदस्यांच्या टीमची निवड केलीय. श्रीलंकेनं भारताला धोबीपछाड देण्यासाठी उत्कृष्ट टीमची निवड केलीय. संघाची कमान दसून शनाकाच्या हातात असून, चरिथ असालांका उपकर्णधार आहे.

संघात चंडिमल, वनेंदू हसरंगासारखे खेळाडू आहेत. आयपीएल लिलाव 2022 मध्ये हसरंगाला 10.75 कोटी इतकी मोठी बोली मिळाली आणि अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्यात. याशिवाय मिस्ट्री स्पिनर महिष तेक्षनालाही संघात संधी मिळालीय, ज्याच्यावर चेन्नई सुपर किंग्जने सट्टा लावलाय. याशिवाय दुष्मंता चमिरा हा देखील श्रीलंकेच्या संघाचा एक भाग आहे.

- Advertisement -

टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ

दासून शनाका, चारिथ असलंका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, धनुष्का गुनाथिलका, कामिल मिश्रा, जानाथ लियानागे, वानेंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुष्मंता बृहन्ना, फर्नांदो फर्नान्का, फर्नांदो, फर्नांडो, चंडिमल जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रम, आशियान डॅनियल्स.


श्रीलंकेचा संघ नुकताच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, जिथे त्यांना टी-20 मालिकेत 1-4 असा मोठा पराभव पत्करावा लागला होता. संघाने पहिले चार सामने गमावले आणि शेवटचा सामना पहिल्या एका चेंडूवर 5 विकेटने जिंकला. श्रीलंकेने मालिका गमावली असली तरी ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला कडवी झुंज दिली. विशेषत: कुसल मेंडिसने 50 च्या सरासरीने 100 धावा केल्यात. निसांकाने 26.80 च्या सरासरीने सर्वाधिक 184 धावा केल्या. शनाकानेही फलंदाजीत चांगले योगदान दिले. गोलंदाजीत महिष तेक्षनाने 5 बळी घेतले. दुष्मंता चमिराने सर्वाधिक 7 विकेट घेतल्यात. वनेंदू हसरंगाने 2 सामन्यात 5 विकेट घेतल्या. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा संघ नक्कीच उतरणार हे स्पष्ट झालेय.

- Advertisement -

भारताचा श्रीलंका दौरा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर दोन कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे. 24 फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथे टी-20 सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून मोहालीत तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बंगळुरू येथे होणार आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -