घरक्रीडाInd Vs Aus : भारतीय संघाची ८८ वर्षापूर्वीच्या सर्वात कमी स्कोअरच्या विक्रमाची...

Ind Vs Aus : भारतीय संघाची ८८ वर्षापूर्वीच्या सर्वात कमी स्कोअरच्या विक्रमाची बरोबरी

Subscribe

बॉर्डर गावस्कर ट्रॉफिमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळताना संपुर्ण भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर गारद होण्याची नामुष्की भारतीय संघावर आज ओढावली. गेल्या ६५ वर्षांमधील सर्वात कमी असलेला हा भारतीय संघाचा स्कोर आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच कसोटी सामन्यात शनिवार भारतीय संघाने पहिल्याच सत्रात केलेल्या सुमार फलंदाजीमुळे आता भारतीय संघावर पराभवाचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. नाणेफेक जिंकूनही भारताला अवघ्या तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या भेदक गोलंदावीर लोटांगण घालण्याची वेळ आली आहे.

याआधीची भारताची कमी धावसंख्या

भारताचा १९७४ साली ऑस्ट्रेलियाविरोधातच अवघ्या ४२ धावात डाव आटपला होता
आशियाई देशांमध्ये भारताच्या नावावर हा कमी धावांचा विक्रम होता
आज पहिल्याच कसोटीतील दुसऱ्या इनिंगमध्ये ३६ धावांवर बाद होऊन भारती संघाने हा विक्रम मोडला आहे
तर ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वात कमी धावांचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता
दक्षिण आफ्रिकेचाही डाव १९३२ साली अवघ्या ३६ धावांवर आटोपला होता
त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेच्या ८८ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -