घरक्रीडाIND vs SL : दुसऱ्या वनडेत भारताची श्रीलंकेवर मात, मालिकेत २-० अशी...

IND vs SL : दुसऱ्या वनडेत भारताची श्रीलंकेवर मात, मालिकेत २-० अशी आघाडी

Subscribe

भारतीय संघाने टी-२० पाठोपाठ वनडे मालिकेतही विजयी आघाडी मिळवली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत २-० अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेच्या विजयासह भारताने मिशन वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली आहे. भारताने श्रीलंकेचे २१६ धावांचे आव्हान ६ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भारताचा वेगवान फलंदाज केएल राहुलने अर्धशतक करत १०३ चेंडूत नाबाद ६४ धावा ठोकल्या. हार्दिक पांड्याने ३६ धावा केल्या. रोहित शर्माला यावेळी १७ धावा करता आल्या. तर शुभमन गिलही २१ धावांवर बाद झाला.

- Advertisement -

विराट कोहली या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा होती. परंतु कोहली या सामन्यात क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. श्रेयस अय्यरही २८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने चांगली भागिदारी केली. राहुलने अर्धशतक तर पांड्याने ३६ धावा केल्या.

गुवाहाटीत झालेल्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने ईडन गार्डन मध्येही श्रीलंकेचा पराभव केला. यावेळी भारताने या सामन्यासाठी युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली होती.

- Advertisement -

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ३९.४ षट्कात २१५ धावा केल्या. तर २१६ धावांचं आव्हान हे श्रीलंकेने भारताला दिलं होतं. यावेळी भारताने धमाकेदार खेळी करत दुसरीही मालिका खिशात घातली आहे. दरम्यान, पुढील सामना हा येत्या रविवारी तिरुअनंतपुरमला १५ जानेवारी रोजी होणार आहे.


हेही वाचा : IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचं भारतासमोर २१६ धावांचं आव्हान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -