आगामी टी 20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघ दोन संघांसोबत मालिका खेळणार

आगामी टी 20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघ दोन संघांबरोबर सामने खेळणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

आगामी टी 20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघ दोन संघांबरोबर सामने खेळणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार असून, त्यानंतर तीन टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 मालिकेचा पहिला सामना मोहाली मध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर 23 सप्टेंबरला दुसरा सामना नागपूर आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबरला हैदराबाद मध्ये होणार आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मलिकेचा पहिला सामना 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रम येथे होणार असून, दुसरा सामना 1 ऑक्टोबरला गुवाहाटीत आणि शेवटचा सामना 3 ऑक्टोबरला इंदूरमध्ये होणार आहे.

टी 20 मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे, टी 20 वर्ल्ड कप खेळणार खेळाडू वनडे मालिकेत नसतील. वनडे मालिकेतील अखेरचा सामना कोलकातामध्ये खेळवायची योजना होती. पण रोटेशन पॉलिसीनुसार अखेरचा समाना दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदाच्या टी 20मध्ये भारतीय संघ कप जिंकण्याच्या दृष्टीनेच खेळेल.


हेही वाचा – नीरज चोप्राची पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये धडक, सुवर्णपदकासाठी सज्ज; व्हिडीओ व्हायरल