बॉक्सिंग-डे कसोटी प्रीव्ह्यू  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला झुंज देईल अशी अपेक्षा होता. परंतु, पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच आता विराट कोहली दुसऱ्या कसोटीत खेळणार नसून त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. कर्णधार रहाणे आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सामन्यासाठी संघात बरेच बदल केले आहेत. हे बदल किती यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.