घरठाणेएकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात; हाताला दुखापत, थोडक्यात बचावले!

एकनाथ शिंदेंच्या गाडीला अपघात; हाताला दुखापत, थोडक्यात बचावले!

Subscribe

राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा हा अपघात झाला असून यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गाडीच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे ही गाडी टो करून घेऊन जावी लागली. या अपघातामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागला असून त्यांच्या अंगठ्याला देखील दुखापत झाल्याची माहिती आहे. वाशी टोलनाक्याच्या काही अंतर पुढे हा अपघात झाला. मानखुर्द हद्दीमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळाली असून त्यासंदर्भात अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

एकनाथ शिंदे गुरुवारी संध्याकाळी मुंबईच्या दिशेने निघाले असताना वाशी टोलनाक्याच्या काही अंतर पुढे ही अपघाताची घटना घडली. यावेळी शिंदे त्यांच्या टोयोटा एसयूव्ही कारमध्ये होते. या कारचे फोटो व्हायरल झाले असून त्यावरून कारला पुढच्या बाजूने धडक बसली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या हाताला जरी मार लागला असला, तरी त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -