घरक्रीडाIND vs ENG : भारतीय फलंदाजांचे कामगिरीत सुधारणा करण्याचे लक्ष्य; दुसऱ्या कसोटीत...

IND vs ENG : भारतीय फलंदाजांचे कामगिरीत सुधारणा करण्याचे लक्ष्य; दुसऱ्या कसोटीत पुजारा, कोहलीवर नजर

Subscribe

दुसऱ्या कसोटीत मोठी खेळी करण्यासाठी भारताच्या प्रमुख फलंदाजांवर दडपण आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय फलंदाजांचे कामगिरी सुधारणा करण्याचे लक्ष्य असेल. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीनंतर भारताला केवळ २७८ धावा करता आल्या. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत या तिघांवर मोठी खेळी करण्यासाठी दडपण आहे.

फलंदाजांच्या कामगिरी सातत्याचा अभाव 

पुजारा, कोहली आणि रहाणे हे भारतीय कसोटी संघाचे आधारस्तंभ मानले जातात. परंतु, या तिघांनाही मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मागील दोन वर्षांत रहाणेने केवळ एक शतक केले असून पुजारा आणि कोहलीला शतकाने हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत या तीन प्रमुख फलंदाजांच्या कामगिरी सुधारणा होईल अशी भारतीय संघाला आशा आहे. पहिल्या कसोटी रोहित शर्मा (३६ व नाबाद १२) आणि लोकेश राहुल (८४ व २६) या सलामीवीरांनी मात्र आव्हानात्मक परिस्थितीत चांगली फलंदाजी केली. लॉर्ड्सवरील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असण्याची शक्यता असून याचा भारतीय फलंदाजांना फायदा होऊ शकेल.

- Advertisement -

अश्विनचे होणार संघात पुनरागमन?

गोलंदाजीत भारताला एक बदल करावा लागणार आहे. मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पायाच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन होऊ शकेल. परंतु, भारताने पुन्हा चार वेगवान गोलंदाजांसह खेळायचा निर्णय घेतल्यास ईशांत शर्मा किंवा उमेश यादवला संघात स्थान मिळू शकेल. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज त्यांचे संघातील स्थान कायम राखण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ (संभाव्य ११) – भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा,अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

- Advertisement -

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉम सिबले, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, सॅम करन, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड, जेम्स अँडरसन.

सामन्याची वेळ : दुपारी ३.३० पासून; थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -