घरक्रीडापुरुषांप्रमाणे आता महिला खेळाडूंनाही मिळणार समान मानधन, BCCI ची मोठी घोषणा

पुरुषांप्रमाणे आता महिला खेळाडूंनाही मिळणार समान मानधन, BCCI ची मोठी घोषणा

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला- पुरुष खेळाडूंच्या मानधनाबाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या भारतीय महिला क्रिकेटूंना पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे समान मानधन देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विविध क्रिकेट सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्सप्रमाणे आता महिला क्रिकेटपटूंनाही समान वेतन असेल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्सला 15 रुपये दिले जातात. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्स 3 लाख रुपये मानधन दिले जातात, त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही तितकेच मानधन मिळणार आहे.

- Advertisement -

जय शाह यांनी असेही म्हटले की, बीसीसीआय करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी पे इक्विटी धोरण (pay equity policy) लागू करत आहे. क्रिकेटर्स क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत असून यासाठी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल. दरम्यान या निर्णयाला पाठींबा दिल्याबद्दल जय शाह यांनी सर्वोच्च परिषदेचेही आभार मानले आहेत.

- Advertisement -

पुरुष क्रिकेटर्सला एका सामान्यासाठी किती मानधन मिळते ?

एका कसोटी सामन्यासाठी : 15 लाख रुपये
एकदिवसीय सामन्यासाठी : 6 लाख रुपये
एका टी-20 सामन्यासाठी : 3 लाख रुपये


गिरगावात भीषण आग; गोदामासह १४ वाहने जळून खाक; एकजण जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -