घरक्रीडाIND vs WI : भारताचा 88 धावांनी विजय; फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिज ठरली...

IND vs WI : भारताचा 88 धावांनी विजय; फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिज ठरली फेल

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने 4-1 ने वेस्ट इंडिजवर मात केली आहे. भारतीय संघातील फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर चेंडूचा मारा करत 100 धावांवर सर्वबाद केले.

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने 4-1 ने वेस्ट इंडिजवर मात केली आहे. भारतीय संघातील फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर चेंडूचा मारा करत 100 धावांवर सर्वबाद केले. वेस्ट इंडिजचे सर्व फलंदाज फिरकीपटूंनी बाद करत सामना 88 धावांनी जिंकला. (India won by 88 runs against west indies in t20 final match)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 189 धावाचे आव्हान वेस्ट इंडिज समोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 100 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारताकडून 10 च्या 10 गडी हे फिरकीपटूंनी बाद केले. यामध्ये सर्वाधिक विकेट्से युवा रवी बिश्नोईने तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. भारताच्या फलंदाजीत श्रेयसचे अर्धशतक आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याची तुफानी खेळी महत्त्वाची ठरली.

- Advertisement -

या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असल्याने कर्णधार म्हणून रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली होती. विशेष म्हणजे अनुभवी कुलदीप यादवही संघात परतला होता. अशामध्ये प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने ईशानची विकेट लगेच गमावली. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरत अर्धशतकी खेळी केली.

अय्यरने 64 धावा केल्या असताना दीपक हुडाने त्याला 38 धावांची मदत केली. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार पांड्याने 28 धावांची तुफान खेळी खेळत भारताची धावसंख्या 188 पर्यंत नेली.

- Advertisement -

भारताने दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर याने 56 धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली. मात्र, इतर खेळाडूंना फारशी चांगली खेळी करता आली नाही.


हेही वाचा –  CWG 2022 : ऑस्ट्रेलियाचा ‘सुवर्ण’ विजय, तर भारतीय संघ ठरला रौप्यपदकाच्या मानकरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -