घरक्रीडाIndia Schedule 2022: जानेवारीसह वर्षभर होणार क्रिकेटचा धमाका, पाहा सामन्यांचे पूर्ण शेड्यूल

India Schedule 2022: जानेवारीसह वर्षभर होणार क्रिकेटचा धमाका, पाहा सामन्यांचे पूर्ण शेड्यूल

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा आईसीसी टी२० वर्ल्ड कप २०२१ मध्ये भारताची कामगिरी चांगली ठरली नाही परंतु वर्षभरातील सगळ्या एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. २०२२ मध्ये भारतीय टीमला अनेक सामने खेळायचे आहे. तसेच यंदा भारतीय टीममध्ये सफेद चेंडू आणि लाल चेंडूच्या सामन्यासाठी वेगवेगळे कर्णधार असतील. यंदाचा टी२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. आयपीएल देखील १० संघांमध्येच होणार आहे. जानेवारीमध्ये क्रिकेटचे अनेक सामने असणार आहेत त्यामुळे वर्षाच्या पहिल्या महिन्यात प्रेक्षकांसाठी क्रिकेटच क्रिकेट पाहायला मिळणार आहे.

भारतीय टीम २०२२च्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून करणार आहे. भारताला कसोटी मालिकेचे उर्वरित २ सामने आणि ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. भारत विरुद्ध आफ्रिकेचे सामने, ३ ते ७ जानेवारीला दुसरा कसोटी सामना जोहन्सबर्ग, ११-१५ जानेवारी तिसरा कसोटी सामना केप टाऊन येथे असेल तर १९ जानेवारी एकदिवसीय सामना पार्ल येथे, २१ जानेवारी आणि २३ जानेवारीला तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

वेस्टइंजीचा भारत दौरा

दक्षिण आफ्रिकेचा दौरा झाल्यावर वेस्टइंडीजची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतात ३ टी२० आंतरराष्ट्रीय आणि ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात येणार आहेत. हे सामने फेब्रुवारी २०२२ मध्ये आयोजित करण्यात आले आहेत. ६, ९ आणि १२ फेब्रुवारीला अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. तर १५ फेब्रुवारीला पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना, १८ फेब्रुवारीला दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना आणि २० फेब्रुवारीला तिसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला कटक तर उर्वरित दोन्ही सामने तिरुवनंतरपुरम येथे आयोजित करण्यात आले आहेत.

श्रीलंकेचा भारत दौरा

वेस्टइंडीजच्या भारत दौरा झाल्यानंतर श्रीलंका भारत दौऱ्यावर असेल. श्रीलंकेची टीम भारतात तीन टी२० आंतरराष्ट्रीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. २५ फेब्रुवारी ते १ मार्च पहिला कसोटी सामना बंगळूरू तर ५-९ मार्च दुसरी टेस्ट मॅच मोहाली, १३ मार्च पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना मोहाली, १५ मार्च दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना धर्मशाला तर १८ मार्च तिसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना लखनऊ येथे खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिका करणार भारत दौरा

आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर असेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये ५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. टी२० वर्ल्डकपच्या पूर्वी भारताला तयारी करण्यासाठी या सामन्याचा चांगला फायदा होऊ शकतो. ९ जून पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना चेन्नई, १२ जून दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना बंगळूरू, १४ जून तिसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना नागपुर, १७ जून चौथा टी२० आंतरराष्ट्रीय सामना राजकोट, १९ जून पाचवा टी२० आंतरराष्ट्रीय सामना दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.

भारताचा इंग्लंड दौरा

भारतीय टीम इग्लंड दौरा करणार आहे. मागील वर्षी राहिलेला पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यामध्ये १ ते ५ जुलै पाचवा कसोटी सामना बर्मिंगहम येथे होणार आहे. तर ७ जुलै पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना, ९ जुलै दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना, १० जुलै तिसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना नॉटिंगम, १२ जुलै पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना लंडन, १४ जुलै दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना लंडन, १७ जुलै तिसरा एकदिवसीय सामना मॅन्चेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या महिन्यात टी२० विश्वचषकाचे आयोजन

टी२० विश्वचषक १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून एकूण ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत.


हेही वाचा : India vs South Africa, ODI Team: आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला रोहित मुकणार, राहुलकडे कर्णधारपदाची धुरा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -