घरक्रीडाIND vs ENG : कुलदीप यादव पुन्हा संघाबाहेर! चाहते कर्णधार कोहलीवर भडकले 

IND vs ENG : कुलदीप यादव पुन्हा संघाबाहेर! चाहते कर्णधार कोहलीवर भडकले 

Subscribe

भारताने अश्विन, नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये घेत कुलदीपला संघाबाहेर ठेवले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला या सामन्यात संधी मिळाले अशी सर्वांना अपेक्षा होता. मात्र, भारताने पहिल्या कसोटीसाठी अश्विन, शाहबाझ नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये घेत कुलदीपला संघाबाहेर ठेवले. कुलदीपने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असून २४ विकेट घेतल्या आहेत. त्याला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत संधी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यातच सामना सुरु होण्याआधी काही तास अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे कुलदीपला संधी मिळवण्याची शक्यता वाढली. परंतु, अक्षरच्या दुखापतीनंतर शाहबाझ नदीमची संघात निवड झाली आणि त्याचा थेट प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला. कुलदीपकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले गेले ही गोष्ट भारताच्या चाहत्यांना फारशी आवडली नाही. त्यांनी ट्विटरवरून कर्णधार विराट कोहली आणि भारताच्या संघ व्यवस्थापनावर टीका केली.

- Advertisement -

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -