घरक्रीडाभारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचे मालिकेत १-२ ने पुनरागमन

भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचे मालिकेत १-२ ने पुनरागमन

Subscribe

मुंबई : इंदौर येथे सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकातच १ विकेट गमावून भारताने दिलेले आव्हान पूर्ण केले आणि मालिकेत १-२ ने पुनरागमन केले.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्या डावातील ८८ धावांच्या मदतीने भारताचा दुसरा डाव सर्वबाद १६३ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला फक्त ७५ आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकात १ विकेट गमावून हे आव्हान पूर्ण केले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावाची सुरुवात केल्यानंतर आर अश्विनने उसमान ख्वाजाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बाद केले. पण त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी संघाचा डाव सावरला आणि ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना जिंकवून दिला. ट्रॅव्हिस हेडने ५३ चेंडूत ४९, तर मार्नस लॅबुशेन याने ५८ चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत १-२ ने पुनरागमन केले आहे.

भारताचा पहिला डाव १०९ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात १९७ धावा जोडत ८८ धावांची आघाडी घेतली होती. या आघाडीमुळे भारताने दुसऱ्या डावात १६३ धावा करूनही ऑस्ट्रेलियाला फक्त ७५ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने यशस्वी पाठलाग केला.

- Advertisement -

भारताचा दुसरा डाव १६३ संपुष्टात आणण्यात नॅथन लिऑनचा मोठा हात आहे. नॅथन लिऑनने दुसऱ्या डावात २३.३ षटके गोलंदाजी करताना १ निर्धाव षटक टाकताना ६४ धावा देत सर्वाधिक ८ विकेट घेतल्या. त्याने रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, शिखर भरत, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांच्या विकेट घेतल्या.

भारताचा पहिला डाव
भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी गुडघे टेकण्यास भाग पाडल्यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव 33.2 षटकात 109 धावांवर संपुष्टात आला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ५२ चेंडूंत सर्वाधिक २२ धावा केल्या. याशिवाय खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या शुभमन गिलने २१ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कुहनेमॅनने सर्वाधिक ५ विकेट, तर लिऑनला ३ आणि मर्फीला १ विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाचा संघाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला. यावेळी उसमान ख्वाजाने सर्वाधिक ६० धावा, तर मार्नस लॅबुशेन (३१), स्टीव स्मिथ (२६), हँड्सकॉम (१९) आणि कॅमेरून ग्रीनने (२१) धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला १० चा आकडा पार करता आला नाही. भारताकडून रविंद्र जडेजाने ४, तर अश्विन आणि उमेश यादव यांना प्रत्येकी ३ विकेट मिळाल्या.

भारताचा दुसरा डाव
दुसऱ्या डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने १४२ चेंडूत सर्वाधिक ५९ धावा केल्या. या धावा करताना ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. पुजाराशिवाय श्रेयस अय्यरने २६ धावांचे योगदान दिले, तर इतर फलंदाजांना २० चा आकडाही पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लिऑनने सर्वाधिक ८ विकेट घेतल्या, तर कुहनेमॅन आणि स्टार्कला प्रत्येकी १ विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ४९ धावा, तर मार्नस लॅबुशेनने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून आर अश्विनला १ विकेट मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -