घरक्रीडाIPL 2021 : कोरोना लस घ्यायची की नाही, हे खेळाडूच ठरवतील! BCCI...

IPL 2021 : कोरोना लस घ्यायची की नाही, हे खेळाडूच ठरवतील! BCCI ची स्पष्ट भूमिका

Subscribe

खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बीसीसीआय कोणती पावले उचलणार? ते सर्वांना लस घेणे बंधनकारक करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काही खेळाडूंना या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बीसीसीआय कोणती पावले उचलणार? ते सर्वांना लस घेणे बंधनकारक करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंचा असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

भारतीय खेळाडूंनाच लस

भारतीय खेळाडू येत्या शनिवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊ शकणार आहेत. मात्र, लस घ्यायची की नाही, हे खेळाडूच ठरवतील. आम्ही त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच परदेशी खेळाडूंना लस घेता येणार आहे का? असे विचारले असता सूत्रांनी सांगितले, केवळ भारतीय खेळाडूंनाच लस घेण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

कमिन्सने जपले सामाजिक भान

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच साधारण ३७ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले. तसेच जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदतनिधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही कमिन्सने केले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -