Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : मुंबई इंडियन्स जेतेपदाचा षटकार मारणार; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे मत

IPL 2021 : मुंबई इंडियन्स जेतेपदाचा षटकार मारणार; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे मत

मुंबईने मागील वर्षी सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला यंदा पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने मागील वर्षी सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे मुंबईचा संघ आता जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी उत्सुक आहे. मुंबईला यंदाही पराभूत करणे इतर संघांना अवघड जाईल, असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला वाटते.

मुंबईचा संघ टीम इंडियापेक्षा दर्जेदार

मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही आयपीएलचे जेतेपद पटकावेल असे मला वाटते. मात्र, अचानक मुंबईचा खेळ खालावला आणि त्यांनी निराशाजनक कामगिरी केली, तर सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरू शकेल, असे वॉन म्हणाला. मागील महिन्यातही वॉनने मुंबई इंडियन्सच्या संघाचे कौतुक केले होते. मुंबईचा संघ हा टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघापेक्षाही दर्जेदार असल्याचे वॉन म्हणाला होता.

आम्हीच आयपीएल जिंकणार

- Advertisement -

मुंबई इंडियन्सचा संघ यंदा जेतेपद पटकावणारच असा विश्वास लेगस्पिनर राहुल चहरने व्यक्त केला. आम्ही जेतेपदाचा षटकार मारू याचा मला विश्वास आहे. आमचे सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी मागील काही काळात दमदार कामगिरी केली आहे. आमचा संघ संतुलित असून यंदाही आम्हाला जेतेपद पटकावण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे, असे चहर म्हणाला.

- Advertisement -