घरक्रीडाIPL 2021 : KKR चा कर्णधार इयॉन मॉर्गनला दंड 

IPL 2021 : KKR चा कर्णधार इयॉन मॉर्गनला दंड 

Subscribe

मॉर्गनला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात कोलकाताने षटकांची गती न राखल्याने (स्लो-ओव्हर रेट) कर्णधार इयॉन मॉर्गनला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, संघ षटकांची गती राखण्यात अपयशी ठरल्यास पहिल्यांदा कर्णधाराला १२ लाखांचा दंड होतो. दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला २४ लाखांचा दंड होतो आणि सामन्यात खेळलेल्या प्रत्येक खेळाडूच्या मानधनातून २५ टक्के रक्कम किंवा ६ लाख यापैकी जे कमी असेल, ते कापण्यात येते.

फॅफच्या नाबाद ९५ धावा

या सामन्यात चेन्नईने कोलकाताला १८ धावांनी पराभूत केले. हा चेन्नईचा सलग तिसरा विजय ठरला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २२० धावांचा डोंगर उभारला होता. त्यांच्याकडून ऋतुराज गायकवाड (६४) आणि फॅफ डू प्लेसिस (नाबाद ९५) यांनी चांगली कामगिरी केली होती. २२१ धावांचा पाठलाग करताना कोलकाताला २०२ धावाच करता आल्या. पॅट कमिन्स (नाबाद ६६) आणि आंद्रे रसेल (५४) यांनी फटकेबाजी करत कोलकाताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोलकाताला विजयासाठी १८ धावा कमी पडल्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -