घरक्रीडाIPL 2021 : क्वालिफायरनंतर RCB ट्रोल, मग ग्लेन मॅक्सवेलनेही सुनावले

IPL 2021 : क्वालिफायरनंतर RCB ट्रोल, मग ग्लेन मॅक्सवेलनेही सुनावले

Subscribe

रॉयल चँलेंजर बेंगळुरूचा ऑलराउंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा आयपीएल २०२१ हंगामातील प्रवास एका कटू आठवणीने संपुष्टात आला. शारजाह येथे झालेल्या सोमवारच्या एलिमिनेटर सामन्यात केकेआरने आरसीबीचा ४ बळी राखून पराभव केला. ह्या सामन्यात आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. गोलंदाजीत त्याने २५ धावा देऊनदेखील तो एकही बळी घेऊ शकला नाही. तर तिकडे केकेआरच्या सुनिल नारायणने फलंदाजी आणि गोलंदाजीतून कमाल करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

- Advertisement -

सामन्यानंतर सोशल मिडियावर कोहलीच्या आरसीबीच्या समर्थनार्थ अनेक संवेदनशील प्रतिक्रिया आल्या. पण त्यातच ट्रोल करणाऱ्यांचा आकडाही मोठा होता. जे विराटच्या संघाबद्दल हास्यास्पद लिखाण करत होते, त्यांच्या काहीही अपमानास्पद गोष्टी वायरल करत होते. ट्विटरवर तर ऱॉयल फिक्सर चँलेंजर हा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात सुरू होता.

सामन्याच्या काही तासांनंतर मॅक्सवेलने समर्थकांचे त्यांच्या समर्थनासाठी आभार देखील मानले, पण शिवीगाळ करणाऱ्या ट्रोलर्संना मात्र तिखट भाषेत सुनावले. मॅक्सवेलने ट्विटरवरून माहिती दिली की RCB हा शानदार हंगाम राहिला. दुर्देवाने आम्हाला जिथं असायला हवं होतं, तिथून थोडे लांबच राहिलो. पण एक हंगाम अतिमहत्त्वाचा असू शकत नाही. सोशल मिडियावर जो कचरा वाहतोय तो खूप निंदणीय आहे, आम्ही माणसं आहोत” जे प्रत्येक दिवशी आमचे सर्वश्रेष्ठ देत आहोत”.’ चुकीच्या गोष्टी पसरवण्याऐवजी एक सभ्य व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. खऱ्या समर्थकांना धन्यवाद, ज्यांनी खेळांडूसाठी आपले प्रेम आपले सगळं काही दिले. दुर्देवाने त्यात काही दुष्ट वृत्तीचेही लोक आहेत, जे सोशल मिडीयावर भयानक वागतात ही गोष्ट बरोबर नाही, कृपया त्यांच्या सारखे आपण बनू नका, अशा शब्दांत मॅक्सवेलने ट्विटरवर त्याचे मत मांडले.

- Advertisement -

आरसीबीच्या ऑलरांउडरने ट्रोलर्संचा समाचार घेताना असे देखील लिहले, जर कोणी माझ्या कोणत्या मित्राविरूध्द सोशल मिडियावर काही नकारात्मक आक्षेर्पाह भाष्य करत असेल तर तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून त्याला ब्लॉक केल जाईल, खराब व्यक्ती असणे म्हणजे काय? तिथे कोणतेही नाटक चालणार नाही. अशा तीव्र शब्दांत मॅक्सवेलने ट्रोलर्संचा चांगलाच समाचार घेतला.

आयपीएल २०२१ मधील विराट कोहलीचा कर्णधार पदाचा कालखंड सोमवारी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी संपुष्टात आला. जेव्हा आरसीबीचा केकेआरकडून एलिमिनेटरच्या सामन्यात पराभव करण्यात आला. ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२१ मध्ये आपल्या संघाकडून सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -