Sonam Kapoorच्या पतीच्या कपड्यांच्या ब्रँडचे फोटोशूट पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये, पाहा व्हायरल फोटो

bollywood actress sonam kapoor husband anand ahuja clothing brand bhaane photoshoot in pakistan
Sonam Kapoorच्या पतीच्या कपड्यांच्या ब्रँडचे फोटोशूट पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये, पाहा व्हायरल फोटो

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील फॅशनिस्टा सोनम कपूर आपल्या फॅशन सेंसमुळे नेहमी चर्चेत असते. तसेच सोनमचा पती आनंद आहूजा फॅशन वर्ल्डमध्ये खूप सक्रिय आहे. आनंद आहूजाचा लोकप्रिय कपड्यांचा ब्रँड Bhaane आहे. या ब्रँडमध्ये मुला मुलींचे कंफर्टेबल आणि सिम्पलिसिटी यावरून इन्स्पायर्ड कपडे बनवतात. नुकतंच आनंद आहूजाने आपल्या कपड्यांच्या ब्रँडसाठी लेटेस्ट फोटोशूट पाकिस्तानमध्ये केले आहे.

सोनम कपूरचा पती आनंद आहूजाने आपल्या कपड्यांच्या ब्रँडचे कोलँबोरेशन पाकिस्तामध्ये केले आहे. आनंद आहूजाने पाकिस्तानच्या लाहोरचे लोकप्रिय Allama Iqbal Townमध्ये नवे फोटोशूट केले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhaane (@bhaane)

आनंद आहूजाच्या कपड्याच्या ब्रँड Bhaaneच्या सोशल मीडियावर हँडवर नव्या कलेक्शनचे फोटोशूटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये पाकिस्तानी मॉडल्स लाहोरच्या गल्ल्यांमध्ये आनंद आहूजाच्या ब्रँडचे कपडे घालून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhaane (@bhaane)

Bhaaneच्या सोशल मीडिया हँडलवर लाहोरच्या गल्ल्यांमध्ये झालेले फोटोशूटला खास कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमधून लाहोरच्या या परिसरातील डिझाईन आणि त्यासंबंधित काम करणाऱ्यांचे कौतुक केले आहे. जास्तकरून हे फोटोशूट कॉलोनी बाहेरच्या दरवाज्यांवर केले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhaane (@bhaane)

दरम्यान सोनमचा पती आनंद आहूजा हा पहिला ब्रँड नाही आहे, ज्याने पाकिस्तामध्ये जाऊन पाकिस्तानी मॉडेल्ससोबत फोटोशूट केले आहे. यापूर्वी डिझाईनर अभिनव मिश्राने पाकिस्तामध्ये जाऊन ब्रायडल फोटोशूट केले होते.


हेही वाचा – आमिरप्रमाणे तुमचेही लग्न टिकणार नाही’; युजरच्या कमेंटवर भडकली रिचा चड्ढा