घरक्रीडामुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास; गुजरातचा दणदणीत विजय, आता चेन्नईसोबत फायनल थरार

मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास; गुजरातचा दणदणीत विजय, आता चेन्नईसोबत फायनल थरार

Subscribe

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा क्वॉलिफायरचा दुसरा सामना शुक्रवारी झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. गुजरातने मुंबईवर 62 धावांनी विजय मिळवला असून सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक दिली आहे

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा क्वॉलिफायरचा दुसरा सामना शुक्रवारी झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. गुजरातने मुंबईवर 62 धावांनी विजय मिळवला असून सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक दिली आहे. ( IPL 2023 Mumbai Indians loss A resounding victory for Gujarat now the final thrill with Chennai Vs GT )

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्याच्या सुरुवातील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात टायटन्सकडून फलंदाजीसाठी शुभमन गिल आणि रिद्धिमान साहाची जोडी मैदानात उतरली. शुभमन गिलने मुंबई इंडियन्स विरुद्ध 49 चेंडूत त्याचं आयपीएस 2023 मधलं तिसरं शतक ठोकलं. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने सर्वाधिक 129 धावा केल्या, याशिवाय रिद्धिमान राहाने 18, साई सुदर्शनने 43, हार्दिक पांड्याने 28 तर राशिद खानने 5 धावा केल्या.

- Advertisement -

शुभमनची वादळी खेळी

शुभमनचं हे सीजनमधलं तिसरं शतक होतं. केवळ 49 चेंडूत त्याने शतकी खेळी केली होती. त्यानंतर 17 व्या ओव्हरमध्ये तो बाद झाला. त्याने 60 चेंडूंचा सामना केला आणि धुवांधार 129 धावा केल्या. त्याने आपल्या या इनिंगमध्ये 10 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याला आकाश मधवालने बाद केलं. एवढी मोठी खेळी करुन तो बाद झाला. जेव्हा तो मैदानातून पव्हेलियनकडे जात होता. तेव्हा निराश होऊन मान हलवत होता. त्याच्याकडे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.

इशानच्या दुखापतीचा मुंबईचा फटका

फिल्डिंग करताना इशान किशान याला दुखापत झाली. इशान किशन याच्या डोळ्याला मार लागला. त्यामुळे बदली खेळाडू म्हणून विष्णू विनोद मैदानात उतरला होता. इशान किशन दुखापतग्रस्त झाल्यामुळे नेहल वढेरा आणि रोहित शर्मा यांना सलामी करावी लागली. इशान मुंबईला आक्रमक सुरुवात करुन देण्यात तरबजे आहे, पण दुखापतीमुळे त्याला फलंदाजी करता आली नाही. याचाच फटका मुंबईला बसला.

- Advertisement -

आता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा फायलनचा थरार पाहायला मिळणार आहे.

( हेही वाचा: GT vs MI Qualifier 2 : स्टेडियमबाहेर प्रेक्षकांची तिकीटांसाठी मारामार, VIDEO व्हायरल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -