GT vs MI Qualifier 2 : स्टेडियमबाहेर प्रेक्षकांची तिकीटांसाठी मारामार, VIDEO व्हायरल

आयपीएल २०२३च्या १६ व्या हंगामात आज क्वालिफायर -२ चा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडणार आहे. हा सामना आज सायंकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. प्रत्येक चाहत्याला आजचा सामना पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे. परंतु हा सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षकांनी तिकिटांसाठी प्रचंड गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीचं वातावरण निर्माण झालं आहे. एकप्रकारे तिकिटांसाठी चाहत्यांकडून झुंबड उडाली आहे. तसेच याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंतिम सामन्याआधी आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. मात्र या मॅचआधी बोर्डाकडून मोठी चूक झाली आहे. ज्याची किंमत लोकांना चुकवावी लागली आहे. बीसीसीआयच्या बेजबाबदारपणाचा फटका लोकांना सहन करावा लागत आहे.

बीसीसीआयला आयपीएल २०२३च्या फायनल तिकीटांची प्रोसेस मॅनेज करण्यात अपयश आलं आहे. ज्यामुळे अहमदाबादच्या स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांच्या अंगावर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक या गर्दीत खाली पडले. या चेंगराचेंगरीत महिला सुद्धा अडकल्या. स्टेडियमबाहेर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईने एलिमिनेटरमध्ये कृणाल पंड्याच्या लखनऊ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत क्वालिफायर-२ मध्ये धडक दिली. तर क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केलं आहे. आता गुजरातला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आणखी एक संधी आहे. त्यामुळे गुजरात आणि मुंबईमध्ये आज करो वा मरो ची स्थिती आहे. कारण यापैकी जो संघ सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत धडक देणार आहे.


हेही वाचा : IPL 2023 GT vs MI : गुजरात आणि मुंबईमध्ये आज होणार प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी