घरक्रीडाआयपीएलमध्ये केदार जाधवची अचानक एन्ट्री; 'या' संघातून पुनरागमन

आयपीएलमध्ये केदार जाधवची अचानक एन्ट्री; ‘या’ संघातून पुनरागमन

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामात आतापर्यंत अनेक विक्रमी खेळी झाली आहे. एकीकडे आयपीएलमधील सर्व सामने रोमांचक होत आहेत तर, दुसरीकडे एकपाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू डेविड विली दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामात आतापर्यंत अनेक विक्रमी खेळी झाली आहे. एकीकडे आयपीएलमधील सर्व सामने रोमांचक होत आहेत तर, दुसरीकडे एकपाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू डेविड विली दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. आरसाबीने डेविड विलीची रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. मराठमोळ्या केदार जाधवला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे. (ipl 2023 rcb named kedar jadhav as replacement for david willey)

आयपीएलच्या यंदाच्या लिलावत केदार जाधव अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. जिओ सिनेमासाठी केदार जाधव मराठीतून कॉमेंट्री करत होता. उर्वरित आयपीएल सामन्यासाठी केदार जाधवला बंगळुरूने आपल्या ताफ्यात घेतले आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात डेविड विली याने फक्त तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या आहेत.

- Advertisement -

केदार जाधव याने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ९३ आयपीएल सामन्यात ११९६ धावा केल्या आहेत. केदार जाधव याआधीही बंगळुरूचा संघाचा सदस्य होता. केदार जाधव याला आरसीबीने एक कोटी रुपयांना विकत घेतले होते. केदार जाधव याने बंगळुरूसाठी सतरा सामने खेळले आहे. बंगळुरूचा मध्यक्रम सध्या ढेपाळत आहे. त्यामुळे अनुभवी फलंदाजाला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे.

केदार जाधव सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या मराठी वाहिनीसाठी केदार जाधव समालोचन करत होता. त्यादरम्यान त्याला आरसीबीने ताफ्यात बोलवले. गेल्यावर्षीही समालोचन करणाऱ्या दिनेश कार्तिक याने दमदार पुनरागमन केले होते. दिनेश कार्तिकप्रमाणेच केदार जाधव दमदार कामगिरी करणार का? अशी चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2023 : आजच्या सामन्यावर पावसाचे संकट; लखनऊ-आरसीबी सामना रद्द होण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -