घरक्रीडाIPL 2023 : रिंकू-रसेलने पंजाबच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा; कोलकाताची Points Tableमध्ये मोठी...

IPL 2023 : रिंकू-रसेलने पंजाबच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा; कोलकाताची Points Tableमध्ये मोठी झेप

Subscribe

नवी दिल्ली : IPL 2023च्या 53व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) रिंकू सिंग  (Rinku Singh) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) यांनी तुफानी फलंदाजी करत पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) गोलंदाजा धुव्वा उडवला आणि रिंकू सिंगने शेटच्या चेंडूवर चौकार मारत पंजाबला 5 विकेट्सने पराभव करत सामना जिंकला. या विजयासह कोलकाताने पॉईंट टेबलमध्ये 5वे स्थान गाठल्यामुळे प्ले-ऑफच्या शर्यतीत पोहोचण्याची संधी आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सोमवारी (8 मे) पार पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु पंजाबची सुरूवता खराब झाली. पावर प्लेमध्ये पंजाबने 53 धावांवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर कर्णधार शिखर धवन आणि पाचव्या क्रमाकांवर आलेल्या जितेश शर्माने डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 42 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली. त्यानंतर जितेश शर्मा 21 धावांवर बाद झाला.

- Advertisement -

यानंतर थोड्या थोड्या अंतराने विकेट पडत होत्या. शाहरुख खान (21), ऋषी धवन (19), लियाम लिव्हिंगस्टोन (15) आणि प्रभसिमरन सिंग (12), हरप्रीत ब्रार (17) आणि शिखर धवनने 47 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 57 धावा केल्यामुळे पंजाबने निर्धारीत 20 षटकात 7 विकेट गमावत 179 धावा केल्या. यावेळी कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती 4 षटके गोलंदाजी करताना 26 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हर्षित राणा 2 विकेट, तर सुयश शर्मा आणि कर्णधार नितीश राणा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

पंजाबकडून मिळालेल्या आव्हानाच पाठलाग करताना कोलकाताला पहिला धक्का 38 धावांवर बसला. रहमानउल्ला गुरबाज 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर जेसन रॉय 24 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 38 करून बाद झाला. यानंतर कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांच्यात अर्धशतकीय भागिदारी झाली. परंतु वेंकटेश अय्यर 11 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर लगेचच नितीश राणा 38 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 51 धावा करून बाद झाला.

- Advertisement -

कोलकाताला जिंकण्यासाठी 28 चेंडूत 56 धावांची गरज असताना रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी करत पंजाब किंग्सच्या गोलंदाजा धुव्वा उडवला. आंद्रे रसेल 23 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना रिंकू सिंगने चौकार मारत कोलकाताला विजय मिळवून दिला. कोलकाता संघाने 5 विकेट्स गमावत 182 धावा केल्या. या विजयासह कोलकाताने पॉईंट टेबलमध्ये 5वे स्थान गाठल्यामुळे प्ले-ऑफच्या शर्यतीत पोहोचण्याची संधी आहे. यावेळी पंजाबकडून राहुल चाहरने 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा देत सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नेथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -