IPL 2023 : धोनीला वर्षानुवर्षे अडचणीत आणणारा ‘हा’ एकमेव खेळाडू; इरफानने सांगितला किस्सा

नवी दिल्ली : आयपीएलच्या 2023 (IPL 2023) चा हंगाम शेवट्या षटकात किंवा शेवटच्या चेंडूवर जिंकलेल्या सामन्यांमुळे चर्चेत राहिला असला तरी, विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद या स्पर्धेचे आकर्षण ठरले. या वादानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठानने (Irfan Pathan) एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला की, एम एस धोनीला (Mahendra singh dhoni) वर्षानुवर्षे अडचणीत आणणारा गौतम गंभीरने हा एकमेव खेळाडू आहे.

16 व्या हंगामातील 43 वा लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. या सामन्यातील लखनऊ जायंट्स संघाच्या डावातील 17व्या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि त्याने नवीनला काहीतरी इशारा केल्यानंतर या दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली आणि या वादाचा शेवट विराट आणि गौतम यांच्यापर्यंत पोहचवला. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या दोघांमध्ये आयपीएल 2013 मध्येही वाद झाला होता. तेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता.

विराट कोहली आणि गौतम गंभीर अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. पण गौतम गंभीरचे माजी कर्णधार एम एस धोनीसोबतही चांगले संबंध चांगले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत गंभीरने अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवले आहे. त्यामुळे असे दिसते की धोनी गंभीरला फारसा आवडत नाही. दरम्यान, इरफान पठाणने गंभीर आणि धोनीबद्दल एक किस्सा सांगितला आहे, जो सध्या खूप चर्चेत आहे.

सध्या सुरू असलेल्या हंगामातील 47 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी
(3 मे) लखनऊमध्ये झाला. मात्र, पावसामुळे सामना रद्द करावा लागला. या सामन्यापूर्वी झालेल्या चर्चेत इरफान म्हणाला की, “जेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) कर्णधार होता, तेव्हा तो एम.एस. धोनीच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली होती. धोनीला वर्षानुवर्षे अडचणीत आणणारा तो एकमेव खेळाडू आहे. धोनी यामुळे खूप त्रासला होता, असेही इरफान पठानने सांगतिले. धोनी आणि इरफान पठाण 2016 मध्ये पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होते, त्यावेळचा हा किस्सा आहे.

इरफान म्हणाला की, “गौतम गंभीरने धोनीच्या अहंकाराला आव्हान दिले होते. 2016 मध्ये गंभीरने धोनीविरुद्ध कसोटीसारखी क्षेत्ररक्षण लावले होते आणि गंभीर त्याच्या योजनेत यशस्वी झाला. तेव्हा मी धोनीला पहिल्यांदा अस्वस्थ झाल्याचे पाहिले. मी धोनीला जेवढा ओळखतो, तो नेहमीच शांत आणि मस्त असतो, पण गंभीरने त्याला मानसिक दृष्ट्या अस्वस्थ केले होते, असेही इरफान म्हणाला.