घरमनोरंजनसुशांतसिंह राजपूतचा 'हा' सिनेमा पुन्हा चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

सुशांतसिंह राजपूतचा ‘हा’ सिनेमा पुन्हा चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

Subscribe

गेल्या काही काळापासून बी-टाउनमध्ये असे पाहिले जात आहे की, एखादा नवा आणि लेटेस्ट सिनेमा अधिक वेळ चालत नाहीय. परंतु रुपेरी पडद्यावर जुने सिनेमे प्रदर्शित केले जात आहेत. जे इंडस्ट्रीच्या क्लासिक्समध्ये मोडतात. याआधी शाहरुख खान आणि काजोल यांचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, शाहिद-करिनाचा ‘जब वी मेट’ असे काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्यात आले होते. अशातच आता अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा सिनेमा ही पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. यामुळे सुशांतचे चाहते फारच आनंदी झाले आहेत.

सुशांतच सुपरहिट सिनेमा ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा प्रदर्शित केला जाणार आहे. क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा येत्या १२ मे रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. तसेच तो हिंदी, तमिळ आणि तेलुगू मध्ये सुद्धा पाहू शकता.

- Advertisement -

Tweet:

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूत, कियारा अडवाणी आणि दिशा पाटनी स्टारर एमएस धोनी हा २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सिनेमाने २१.३० कोटींची कमाई केली होती.


हेही वाचा- हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला झाले 43 वर्ष; पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -