घरक्रीडाIPL Auction 2022 : आयपीएल लिलावाचे सूत्रसंचालक ह्युग एडमिड्स अचानक खाली कोसळले,...

IPL Auction 2022 : आयपीएल लिलावाचे सूत्रसंचालक ह्युग एडमिड्स अचानक खाली कोसळले, लिलाव प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय

Subscribe

आयपीएल २०२२च्या १५ व्या हंगामासाठी मेगा लिलावाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा लिलाव शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस असणार आहे. आयपीएलच्या लिलावाचे सूत्रसंचालन करणारे ह्युग एडमिड्स भोवळ येऊन खाली कोसळले. लिलावाची प्रक्रिया सुरू असताना अचानक ह्युग एडमिड्स बेशुद्ध झाल्यानंतर खाली कोसळले. त्यानंतर लिलाव प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदू हसरंगासाठी बोली सुरू होती. हसरंगा हा क्रिकेटच्या मैदानातील मोठं नाव असल्यामुळे त्याला चढा भाव येत होता. याचदरम्यान एडमिड्स यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले.

- Advertisement -

ह्युग एडमिड्स यांचा २३०० ऑक्शनमध्ये सहभाग आहे. तसेच त्यांचा अनुभव सुद्धा दांडगा आहे. आयपीएलच्या रणांगणात ते पहिल्यांदाच होते. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एडमिड्स यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली होती. मात्र, ते बेशुद्ध होऊन खाली कोसळल्यामुळे यामागील नेमकं कारण काय आहे, हे अद्यापही अस्पष्ट आहे.

लिलावाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस पडला आहे. अपेक्षेप्रमाणे २ कोटी मूळ किंमत असलेल्या श्रेयस अय्यरला १० कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला १२.२५ कोटींना खरेदी केलं आहे. कोलकाता संघाने इयॉन मॉर्गनला रिलीज करुन नव्या हंगामात नवा कर्णधार करणार याचे संकेत दिले होते. श्रेयस अय्यरच्या रुपात त्यांना आता कर्णधारपदासाठीचा चेहरा मिळाला आहे.

- Advertisement -

ह्युग एडमिड्स यांना काय झालं?

आयपीएलची लिलाव प्रक्रिया सुरू असताना ह्युग एडमिड्स हे अचानक भुरळ येऊन खाली पडले. कारण एडमिड्स यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे हे बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळले होते. मात्र, त्यांना तात्काळ लिलावादरम्यान वेद्यकीय पथकाने घेऊन जाण्यात आले. त्यामुळे आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. एडमीड्स यांच्यानंतर चारू शर्मा यांच्याकडे लिलावाची प्रक्रियाची धुरा संभाळण्यास दिली आहे.


हेही वाचा : यंदाच्या IPL लिलाव प्रक्रियेला प्रिती झिंटा मुकणार, ‘हे’ आहे कारण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -