घरक्रीडापत्नीचा फोटो ब्लर केल्यामुळे इरफान पठान झाला ट्रोलिंगचा शिकार,जाणून घ्या सविस्तर घटना

पत्नीचा फोटो ब्लर केल्यामुळे इरफान पठान झाला ट्रोलिंगचा शिकार,जाणून घ्या सविस्तर घटना

Subscribe

इरफान पठान नेहमी सोशल मिडियवर आपल्या पत्नी सोबत अनेकदा फोटो पोस्ट करतो पण त्याच्या पत्नीच चेहरा कधीही दिसत नाही. सफा बेग हिच्या चेहर्‍यावर नेहमी बुरखा असतो किंवा ती स्वत: चा चेहरा हाताने लपवते

सोशल मीडियाचा वापर सध्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यन्त,जगाच्या एका टोकापासून ते दुयर्‍या टोकापर्यंत होत असतो. माहितीची देवाण घेवाण करणार्‍या हा सोशल मीडियामुळे कधी डोकेदुखी होईल सांगता येणार नाही. सोशल मीडियावर ट्रोल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नुकतच भारताचा पूर्व ऑलराऊंडर क्रीकेटर इरफान पठान याने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नी सोबत तिचा चेहरा काहीश्या प्रमाणात ब्लर असणारा फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावरील ट्रोलिंग आर्मीने चांगलच निशाणा साधला आहे. यानंतर इरफानने याचे स्पष्टीकरण देत ट्रोलेर्सना गप्प केलं आहे.

- Advertisement -

इरफानने नेटकर्‍यांना उत्तर देतांना लिहले आहे की,”हा फोटो माझ्या क्वीन (wife) ने माझ्या मुलाच्या अकाऊंट वरुन हा फोटो पोस्ट केला होता. पण या फोटोमुळे लोकांच्या खूप नकारात्मकतेला सामोरे जावे लागत आहे. मला तो फोटो इथेही पोस्ट करू द्या. माझ्या पत्नीने स्वत:च्या मर्जीने तो फोटो ब्लर केला आहे. आणि मी तिझा मालिक नाहीये तिचा सोबती आहे.” असे ट्विट केलं आहे.

इरफान पठान नेहमी सोशल मिडियवर आपल्या पत्नी सोबत अनेकदा फोटो पोस्ट करतो पण त्याच्या पत्नीच चेहरा कधीही दिसत नाही. सफा बेग हिच्या चेहर्‍यावर नेहमी बुरखा असतो किंवा ती स्वत: चा चेहरा हाताने लपवते. अशातच इरफानला लोकांच्या टीकेला इरफानला सामोरे जावे लागले आहे.

- Advertisement -

हे हि वाचा -Asian Boxing Championship : शिवा थापाचे सलग पाचवे पदक पक्के; उपांत्य फेरीत धडक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -