घरक्रीडाIND vs AUS 'A' : भारताचे फलंदाज फेल; तर 'या' गोलंदाजाचे अर्धशतक 

IND vs AUS ‘A’ : भारताचे फलंदाज फेल; तर ‘या’ गोलंदाजाचे अर्धशतक 

Subscribe

भारताची ९ बाद १२३ अशी अशी अवस्था झाली होती. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सिडनी येथे होत असलेल्या या ‘डे-नाईट’ सराव सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मात्र अप्रतिम फलंदाजी करत प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. बुमराहने ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावांची खेळी केली.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल केवळ २ धावा करून बाद झाला. यानंतर पृथ्वी शॉ (२९ चेंडूत ४०) आणि शुभमन गिल (५८ चेंडूत ४३) यांनी आक्रमक फलंदाजी करत ६३ धावांची भागीदारी रचली. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर भारताने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची १ बाद ७२ वरून ९ बाद १२३ अशी अशी अवस्था झाली. परंतु, बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १९४ धावा केल्या. बुमराहने नाबाद ५५ धावांची, तर सिराजने २२ धावांची खेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -