घरताज्या घडामोडीप्लास्टिक पिशव्यामधून विदेशी मद्याची तस्करी

प्लास्टिक पिशव्यामधून विदेशी मद्याची तस्करी

Subscribe

127 प्लाटिक पिशव्या, व्हिस्कीचे २१५ जीवंत बुचे जप्त

नाताळसह नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी मद्यपींना थर्टी फर्स्टचे आतापासूनच वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने अवैधरित्या परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी (दि.११) पहाटे नाशिक जव्हार रोडवर अंबोली फाटा शिवार (ता.त्र्यंबकेश्वर) येथे सापळा रचत कारसह एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पथकाने 127 प्लाटिक पिशव्या व व्हिस्कीचे २१५ जीवंत बुचे व कार जप्त केली. अमरोली चारोसी, सूरत येथील प्रियंक बिपीनभाई पटेल (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

- Advertisement -

अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक मोहीम राबविली जात आहे. अंबोला फाटा येथून विदेशी मद्यची तस्करी होणार असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली. त्यानुसार भरारी पथक क्रमांक एकने शुक्रवारी (दि.११) पहाटे इर्टिगा कार (जीजे१५-सीए-६८६३)मध्ये दादरा नगर हवेलीमध्ये विक्रीसाठी असलेली व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य सिग्नेचर व्हिस्कीच्या १५०० मिलीच्या ३१ प्लास्टिक पिशव्या, सिग्नेचर व्हिस्कीचे ६० जीवंत बुचे, रॉयल चॅलेंजर्स व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ३६ प्लास्टिक पिशव्या व ४ रॉयल चॅलेंजर्स १५५ जीवंअ बुचे, रॉयल चॅलेंजर्स व्हिस्कीच्या १५०० मिलीच्या ६० प्लास्टिक पिशव्या मिळून आल्या. पथकाने कारचालक पटेल यास अटक केली. त्याच्या ताब्यातून कारसह ९ लाख १५ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन ढाब्यांमधून बनावट देशी दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापासत्र सुरु केले आहे. पथकाने बुधवारी (दि.९) तळेगाव शिवार (ता.दिंडोरी) येतील हॉटेल संस्कृती ढाबा येथे छापा टाकला. सुरुवातीला बनावट मद्याने भरलेल्या देशी दारुचे ४ हजार ३२० सिलबंद बाटल्यांचे ९० बॉक्स आढळून आले. राजवाडा कसबे वणी (ता.दिंडोरी) येथील साजन नामदेव गायकवाड (वय २२) अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार पथकाने आंबे दिंडोरी-मोहाडी रोडलगतच्या गणेशगाव शिवारातील हॉटेल बैठक ढाब्यामध्ये छापा टाकला. बनावट मद्याने भरलेल्या देशी दारुचे २ हजार ३०४ सिलबंद बाटल्यांचे ४८ बॉक्स आढळून आले. पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -