घरक्रीडाIND vs ENG : जो रूटचे शंभराव्या कसोटीत शतक, दिग्गजांच्या यादीत समाविष्ट 

IND vs ENG : जो रूटचे शंभराव्या कसोटीत शतक, दिग्गजांच्या यादीत समाविष्ट 

Subscribe

कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणाऱ्या रूटने या पहिल्या डावात शतक झळकावले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. रूटने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने दोन कसोटी सामन्यांत एक द्विशतक आणि एका शतकाच्या मदतीने ४२६ धावा फटकावल्या होत्या. हा दमदार फॉर्म त्याने चेन्नई येथे होत असलेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कायम राखला. कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणाऱ्या रूटने या पहिल्या डावात शतक झळकावले. आपल्या १०० व्या कसोटीत शतक झळकावणारा रूट हा जागतिक क्रिकेटमधील केवळ नववा फलंदाज असून इंग्लंडचा तिसरा फलंदाज आहे. याआधी इंग्लंडच्या कॉलिन कॉवड्रे आणि अ‍ॅलेक स्टुअर्ट यांनी ही कामगिरी केली होती.

कसोटीतील २० वे शतक

चेन्नई कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर एक धाव काढत रूटने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २० वे शतक ठरले. तसेच आपल्या १०० व्या कसोटीत शतक करून रूटने दिग्गजांच्या यादीत आपले नाव नोंदवले. १०० व्या कसोटीत शतक करणारा रूट हा जागतिक क्रिकेटमधील केवळ नववा फलंदाज आहे. इंग्लंडच्याच कॉलिन कॉवड्रे यांनी सर्वात आधी ही कामगिरी केली होती. त्यांनी १९६८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या १०० व्या कसोटीत १०४ धावांची खेळी केली होती.

- Advertisement -

रूट व्यतिरिक्त १०० व्या कसोटीत शतक करणारे फलंदाज 

कॉलिन कॉवड्रे (१०४ वि. ऑस्ट्रेलिया), जावेद मियांदाद (१४५ वि. भारत), गॉर्डन ग्रिनीज (१४९ वि. इंग्लंड), अ‍ॅलेक स्टुअर्ट (१०५ वि. वेस्ट इंडिज), इंझमाम-उल-हक (१८४ वि. भारत), रिकी पॉन्टिंग (१२० आणि नाबाद १४३ वि. दक्षिण आफ्रिका), ग्रॅमी स्मिथ (१३१ वि. इंग्लंड) आणि हाशिम आमला (१३४ वि. श्रीलंका)

- Advertisement -

 

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -