घरनवी मुंबईदुसर्‍या टप्प्यातील कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात

दुसर्‍या टप्प्यातील कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात

Subscribe

गेल्या महिन्यातील १६ तारखेपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोव्हिड काळात आरोग्य विषयक सेवा देणार्‍या शासकीय व खासगी आरोग्यकर्मी कोव्हिड योद्ध्यांना लसीकरण केले जात आहे.

गेल्या महिन्यातील १६ तारखेपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोव्हिड काळात आरोग्य विषयक सेवा देणार्‍या शासकीय व खासगी आरोग्यकर्मी कोव्हिड योद्ध्यांना लसीकरण केले जात आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने लसीकरणाचे संपूर्ण नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात २३ हजार ४८० आरोग्यकर्मींची नोंद शासकीय कोवीन पवर करण्यात आलेली आहे. आजपासून दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून यामध्ये पोलीस, सुरक्षा, स्वच्छता व कोव्हिड नियंत्रक कार्यवाहीत सहभागी असलेले इतर शासकीय, महानगरपालिका कर्मचारी अशा कोव्हिड काळात प्रत्यक्ष कृतिशील असणार्‍या फ्रन्टलाईन कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

अपोलो रुग्णालय बेलापूर, रिलायन्स हॉस्पिटल खैरणे एमआयडीसी व नमुंमपा सार्वजनिक रुग्णालय ऐरोली या तीन ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० याप्रमाणे आज फ्रन्टलाईन कर्मचार्‍यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. या तीन केंद्रांवर दुसर्‍या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी १९५ फ्रन्टलाईन कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यातील आरोग्यकर्मींचे नियमित लसीकरण सुरुच असून त्याकरीता १० रुग्णालयांमध्ये ११ केंद्रे कार्यान्वित आहेत. आजच्या दिवसात १४ केंद्रांवर एकूण १२९३ आरोग्यकर्मींना लसीकरण करण्यात आले असून १६ जानेवारीपासून आत्तापर्यंत ७९२६ आरोग्यकर्मी व १९५ फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण ८१२१ कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिकेकडे १५ जानेवारीला २१ हजार व त्यानंतर १९ हजार अशा एकूण ४० हजार कोव्हिड लस प्राप्त झाल्या असून नवी मुंबई महानगरपालिकेने लसींकरता शीतसाखळी तयार केलेली आहे. प्रत्येक केंद्रावर कार्यरत कर्मचार्‍यांना सुयोग्य प्रशिक्षण देण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी स्वत: उपस्थित राहून केंद्रांवर पर्यावेक्षण करत आहेत. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग योग्य रितीने लसीकरण व्हावे, याकरता दक्षतेने कार्यरत आहे.
पहिल्या टप्प्यातील लसीकरणासोबतच शासन निर्देशानुसार दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणालाही सुरुवात झाली असून ही लस अत्यंत सुरक्षित असून कोविन पवर नोंदणी झालेल्या कोव्हिड योद्ध्यांना लसीकरणाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यामध्ये नमूद लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा –

मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर; मनसेच्या सैनिकांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -