घरक्रीडालेस्टर सिटीचा विक्रमी विजय

लेस्टर सिटीचा विक्रमी विजय

Subscribe

साऊथहॅम्पटनवर ९-० अशी मात

लेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात साऊथहॅम्पटनचा ९-० असा धुव्वा उडवला. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची बरोबरी केली. याआधी मार्च १९९५ मध्ये मँचेस्टर युनायटेडने इपस्विचचा ९-० असा पराभव केला होता. तसेच त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात लेस्टरकडून स्टार स्ट्रायकर जेमी वार्डी आणि आयोझे पेरेझ यांनी प्रत्येकी ३-३ गोल केले. एकाच संघातील दोन खेळाडूंनी प्रीमियर लीगच्या एका सामन्यात हॅटट्रिक करण्याची ही दुसरीच वेळ होती.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच लेस्टरने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला बेन चिलवेलने केलेल्या गोलमुळे लेस्टरला १-० अशी आघाडी मिळाली. १२ व्या मिनिटाला रायन बर्टरँडला रेड कार्ड मिळाल्याने साऊथहॅम्पटनला उर्वरित सामन्यात १० खेळाडूंनी खेळावे लागले.१७ व्या मिनिटाला युरी टिलीमन्सने, तर १९ व्या मिनिटाला पेरेझने गोल करत लेस्टरची आघाडी ३-० अशी वाढवली. पेरेझने ३९ व्या मिनिटाला आणि वार्डीने ४५ व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे मध्यंतराला लेस्टरकडे ५-० अशी आघाडी होती. मध्यंतरानंतरही साऊथहॅम्पटनला खेळात सुधारणा करता आली नाही.

- Advertisement -

लेस्टरने मात्र दमदार खेळ सुरु ठेवला. या सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला पेरेझने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. पुढच्याच मिनिटाला वार्डीने आपला दुसरा आणि संघाचा सातवा गोल केला. जेम्स मॅडिसनने आणखी एका गोलची भर घातली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला लेस्टरला पेनल्टी मिळाली. यावर वार्डीने गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे लेस्टरने हा सामना ९-० असा जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -