घरक्रीडाIPL 2023 : W,W,W,W! अखेरच्या षटकात मोहित शर्माची आक्रमक गोलंदाजी; गुजरात विजयी

IPL 2023 : W,W,W,W! अखेरच्या षटकात मोहित शर्माची आक्रमक गोलंदाजी; गुजरात विजयी

Subscribe

W, W, W, W सलग चार विकेट घेत जलद गोलंदाज मोहित शर्माने गुजरात टायटन्सला मोठा विजय मिळवून दिला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला.

W, W, W, W सलग चार विकेट घेत जलद गोलंदाज मोहित शर्माने गुजरात टायटन्सला मोठा विजय मिळवून दिला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने अखेरच्या चार षटकात सामना फिरवत लखनऊला 7 धावांनी पराभूत केले. (Lucknow Supergiants have lost 4 wickets in 4 balls MOHIT SHARMA Gujarat Titans)

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दिलेल्या 136 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात दमदार झाली. सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी करत विजयाचा भक्कम पाया रचला. कर्णधार के. एल. राहुल आणि काइल मेयर्स यांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी काइल मेयर्स मोठा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याने 19 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कृणाल पांड्याने 23 चेंडूत 23 धावा केल्या त्याला नूर अहमदने बाद केले.

- Advertisement -

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरातला मागील सामन्यात हार पत्करावी लागली होती आणि त्यांचा पुन्हा विजयपथावर परतण्याचा प्रयत्न असणार आहे, तर लखनऊ विजयी मालिका कायम राखण्यासाठी घरच्या मैदानावर उतरली आहे. के.एल.राहुलने दुसऱ्याच षटकात कृणाल पांड्याला गोलंदाजीला आणले अन् त्याने शुबमन गिलची (०) विकेट मिळवून दिली. वृद्धीमान साहा आणि हार्दिक पांड्या यांनी गुजरातचा डाव सावरताना लखनऊच्या गोलंदाजांवर हल्लाबोल सुरू केला. गुजरातच्या पॉवर प्लेमधील ४० पैकी ३४ धावा या साहानेच केल्या. गुजरातची ही पॉवर प्लेमधील निचांक धावसंख्या ठरली.

या सामन्यात लोकेश हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ( इनिंग्ज) ७००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. राशीदने सातव्या षटकात लखनऊला धक्का दिला. मायर्स २४ धावांवर त्रिफळाचीत झाला. राशीदच्या पुढच्या षटकात कृणाल पांड्याने स्वीप मारलेला अन् अभिनवसाठी सोपा झेल होता, परंतु त्याने तो टाकला. राशीद त्यानंतर भडकला. लोकेश आज चांगल्या फॉर्मात खेळताना दिसला आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. लोकेशचा खेळ पाहून कृणालनेही GTच्या फिरकीपटूंवर आक्रमण सुरू केले.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2023 : “हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा…”, धोनीने आयपीएल निवृत्तीबाबत केले मोठे विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -