घरक्रीडाBipin Rawat Chopper Crash: रावतांच्या मार्गदर्शनात धोनीने घेतली सैनिकी प्रशिक्षण, माहीने २...

Bipin Rawat Chopper Crash: रावतांच्या मार्गदर्शनात धोनीने घेतली सैनिकी प्रशिक्षण, माहीने २ वर्षांपूर्वीच मागितली होती परवानगी

Subscribe

बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगिरीच्या जंगलात तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टरला अपघात झाला

बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगिरीच्या जंगलात तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टरला अपघात झाला. दरम्यान या अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण सैन्य दलासह देशावर शोककळा पसरल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल बनवले होते. त्याला योग्य सैन्य प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली होती. धोनीनेही त्यांच्याकडे त्याला हे प्रशिक्षण देण्याची विनंती केली होती. भारताचा माजी कर्णधार धोनीची ही विनंती जनरल रावत यांनी मान्य केली होती. त्यानंतर धोनीने पॅराशूट रेजिमेंटमध्ये दोन महिने प्रशिक्षण घेतले.

धोनीने वेस्ट इंडीजचा प्रशिक्षणासाठी दौरा सोडला होता

लक्षणीय बाब म्हणजे त्यावेळी भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार होता. त्यानंतर धोनीने बीसीसीआयला सांगितले की, तो वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. कारण त्याला पुढील दोन महिने भारतीय लष्कराला द्यायचे आहेत.

- Advertisement -

जनरल रावतांनी केले होते धोनीचे कौतुक

प्रशिक्षणादरम्यान जनरल रावत यांनी धोनीबद्दल सांगितले होते की, तो सैन्यात आपले कर्तव्य बजावत आहे. तोही इतर सैनिकांप्रमाणेच संरक्षकाची भूमिका बजावेल. जेव्हा एखाद्या भारतीय नागरिकाला लष्कराची वर्दी परिधान करायची असते, तेव्हा ती वर्दी ज्या जबाबदारीसाठी त्याला देण्यात आली आहे ती पूर्ण करण्यास तो तयार असेल.

जनरल रावत यांनी आणखी म्हंटले की, “धोनीने मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे आणि आम्हाला माहित आहे की तो ते कार्य पूर्ण करण्यास सक्षम आहे. आम्ही तुम्हाला सांगू शकतो की धोनी पॅराशूट रेजिमेंटच्या १०६ पॅरा टेरिटोरियल आर्मी बटालियनच्या प्रशिक्षणाचा भाग बनला होता. या प्रशिक्षणादरम्यान धोनीने सामान्य सैनिकांप्रमाणे गस्त, गार्ड आणि पोस्ट अशा ड्युटी केल्या आहेत.

- Advertisement -

जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू

तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी लष्कराचे एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला.


हे ही वाचा: http://BCCI ने विराटला दिला होता ४८ तासांचा अल्टीमेटम ! आता केएल राहुलकडेही मोठी जबाबदारी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -