घरक्रीडाIPL 2020 : स्टोइनिसने सामना दिल्लीच्या दिशेने फिरवला - मयांक अगरवाल

IPL 2020 : स्टोइनिसने सामना दिल्लीच्या दिशेने फिरवला – मयांक अगरवाल

Subscribe

स्टोइनिसने अवघ्या २१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या.

मार्कस स्टोइनिसच्या अष्टपैलू खेळामुळे सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने फिरला, अशा शब्दांत किंग्स इलेव्हन पंजाबच्या मयांक अगरवालने ऑस्ट्रेलियन खेळाडूची स्तुती केली. दिल्ली आणि पंजाब यांच्यातील आयपीएलचा सामना फारच चुरशीचा झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची १७ व्या षटकात ६ बाद ९६ अशी अवस्था होती. मात्र, यानंतरच्या तीन षटकांत स्टोइनिसने ५७ धावा चोपून काढल्याने दिल्लीने २० षटकांत ८ बाद १५७ अशी धावसंख्या उभारली. स्टोइनिसने अवघ्या २१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्यानंतर पंजाबला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात तीन चेंडूंवर एका धावेची गरज असताना स्टोइनिसने एकही धाव न करू दिल्याने सामना बरोबरीत संपला. त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने विजय मिळवला.

पराभव पचवणे अवघड

सामना आमच्या हातून निसटला असे वाटत असतानाच आम्ही दमदार पुनरागमन केले. तसेच आम्ही नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे हा पराभव पचवणे अवघड आहे. मात्र, हा पहिलाच सामना होता. आम्ही पुढील सामन्यांत चांगली कामगिरी करू शकतो. आम्ही या सामन्यासाठीही खूप सराव केला होता. सर्वच खेळाडू सामन्यासाठी उत्सुक होते आणि आमच्या कामगिरीतून ते दिसले. माझ्या मते स्टोइनिस दोन संघांतील फरक होता. आम्ही केलेल्या चुकांचा त्याने फायदा घेतला. त्यामुळे त्याला श्रेय दिलेच पाहिजे. त्याने गोलंदाजीतही अखेरच्या षटकांत खूपच चांगला खेळ केला. त्यानेच हा सामना दिल्लीच्या दिशेने फिरवला असे म्हणता येईल, असे सामन्यानंतर मयांकने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -