घरताज्या घडामोडीपरदेशात पैसे पाठवण्याऱ्यांना भरावा लागणार कर, १ ऑक्टोबरपासून नियम लागू!

परदेशात पैसे पाठवण्याऱ्यांना भरावा लागणार कर, १ ऑक्टोबरपासून नियम लागू!

Subscribe

आपल्याला परदेशात पैसे पाठवयाचे असल्यास त्यावर आता वेगळा कर भऱावा लागण्याची शक्यता आहे. कारण Tax Collected at Source (TCS) ने या संदर्भातील नियमावलीत बदल केले आहेत. १ ऑक्टोबर २०२० पासून हे नवे नियम लागू होणार आहेत. आता रकमेवर ५ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या (LRS) अंतर्गत हा टॅक्स द्यावा लागेल.

आधीच्या नियमांनुसार LRS अंतर्गत जर तुम्ही वर्षभरात २.५ लाख डॉलरची रक्कम पाठवू शकत होतात त्यावर कोणताही कर लागत नव्हता. आता याच रकमेवर कर आकारणीसाठी TCS द्यावा लागणार आहे. ज्यांची मुलं परदेशात शिकत आहेत अशा अनेक पालकांना मुलासाठी पैसै पाठवावे लागतात किंवा काही लोकांना त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करायची असेल तर त्यांना पैसे पाठवणं गरजेचं असतं.

- Advertisement -

जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी ७ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम वर्षभरात पाठवत असाल तर त्यावर तुम्हाला टॅक्स देण्‍याची गरज नाही. मात्र, ७ लाखांपेक्षा अधिक रकमेवर ०.५ टक्के कर लागणार आहे. टूर पॅकेजला मात्र या करातून वगळण्‍यात आलं आहे.

परदेशात विविध प्रकारच्या देयकांवर TDS लागू होतो. यासह वैद्यकीय उपचार, रूग्णालयांची बिलं, नातेवाईकांना करण्यात येणारी आर्थिक मदत या रकमा TDS अंतर्गत येत नव्हता. या सर्वांसाठी रिझर्व्ह बँकेच्या LRS अंतर्गत सूट मिळाली होती. मूळात कोणतीही भारतीय व्यक्ती परदेशात २.५ लाख डॉलरची रक्कम विना टॅक्स पाठवू शकते. मात्र हीच रक्कम टॅक्स अंतर्गत आणण्‍यासाठी TCS घेण्‍याचा नवीन नियम लागू करण्‍यात आला आहे. यामध्येही काही गोष्‍टी वगळण्‍यात आल्या आहेत, मात्र अन्य सर्व बाबींवर ५ टक्के टॅक्स लागणार आहे. असे अध्‍यक्ष शरद कोहली यांनी सांगितले.

- Advertisement -

याचाच अर्थ तुम्ही १०० रुपये परदेशात पाठवत असाल तर त्यावर ५ टक्के TDS लागू होतो. त्यामुळे ज्याला पैसे मिळायचे आहेत. त्याला ९५ रूपयेच मिळतील. मात्र, TCS अंतर्गत समोरच्या व्यक्तिला पूर्ण १०० रुपये मिळतील पण पाठवणाऱ्या व्यक्तीकडून १०० रुपयांवर ५ टक्के म्हणजे पाच रुपयांचा TCS घेतला जाईल. वास्तविक ही रक्कम पाठवणाऱ्यांच्याच पॅनमध्‍ये क्रेडिट केली जाणार आहे.


हे ही वाचा – कोरोनाशी संबंधीत आजारांवर ‘भांग’ गुणकारी, भारतात चाचणीची शक्यता!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -