घरक्रीडाMS Dhoni : निवृत्तीच्या प्रश्नावरील धोनीचे उत्तर गुलदस्त्यात; म्हणाला, 'तर मला...'

MS Dhoni : निवृत्तीच्या प्रश्नावरील धोनीचे उत्तर गुलदस्त्यात; म्हणाला, ‘तर मला…’

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून महेंद्रसिंग धोनी याच्या आयपीएलमधून निवृत्त होण्यावर चर्चा रंगली आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये नेहमीच धोनीचा विषय आला की त्याच्या निवृत्तीबाबतही बोलले जाते. काही दिवसांपूर्वी यंदाची आयपीएल (IPL 2023) ही धोनीची शेवटची आयपीएल असणार अशी चर्चा होती.

मागील अनेक दिवसांपासून महेंद्रसिंग धोनी याच्या आयपीएलमधून निवृत्त होण्यावर चर्चा रंगली आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये नेहमीच धोनीचा विषय आला की त्याच्या निवृत्तीबाबतही बोलले जाते. काही दिवसांपूर्वी यंदाची आयपीएल (IPL 2023) ही धोनीची शेवटची आयपीएल असणार अशी चर्चा होती. मात्र, अद्याप धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये समालोचक हर्षा भोगले यांनी निवृत्तबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर धोनीने गुलदस्त्यातच ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. (Ms Dhoni 2019 Video Gone Viral After Harsha Bhogle Asked About Every Time Qualify To Play Offs)

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यंदा 10 व्यांदा आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final) खेळणार आहे. चेन्नईने क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीची समालोचक हर्षा भोगले यांनी मुलाखत घेतली.

- Advertisement -

या मुलाखतीत हर्षा भोगले यांनी धोनीला अनेक प्रश्न विचारले. ज्यामध्ये निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी धोनीने या प्रश्नांची उत्तरे देताना आपले इरादे गुलदस्त्यातच ठेवले. दरम्यान, यानंतर धोनीचा 2019 चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. यात देखील हर्षा भोगलेच धोनीला एक प्रश्न विचारतात. आयपीएलने हा व्हिडिओ 24 एप्रिल 2019 ला पोस्ट केला होता.

या व्हिडिओत हर्षा भोगले विचारतात की, चेन्नई संघाची खास गोष्ट काय आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवता? ही गोष्ट जवळपास नक्की असते की तुम्ही लोकं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करणारच. यावर धोनीने अत्यंत खुबीने उत्तर दिले. धोनी म्हणाला की, जर मी हे सर्वांना सांगितले तर मला लिलावात कोणी खरेदी करणार नाही. त्यामुळे तुम्ही याला माझे ट्रेड सिक्रेट म्हणून शकता.’

- Advertisement -

हेही वाचा – शनिवारी, रविवारी लोअर परेल, वरळी दादर, माहिम, धारावीचा पाणीपुरवठा बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -